धुळे : शहरात कोणत्याही प्रकारचे बॅनर लावण्यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत असते. मात्र अनेकजण विना परवानगी बॅनर लावत असतात. अशा पद्धतीने बॅनरच्या माध्यमातून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनर बनवणाऱ्या धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात बिना परवाना बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधामध्ये (Dhule Corporation) धुळे पालिका प्रशासन आक्रमक झाल्याचे या कारवाईच्या माध्यमातून दिसून येत आहे. सध्या सणवार असल्याने या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. या दरम्यान पालिका प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य असताना देखील (Dhule) कुठल्याही प्रकारची परवानगी पालिका प्रशासनाची न घेता लावण्यात आलेल्या बॅनरवर पालिका प्रशासनातर्फे आक्रमक भूमिका घेतली आहे.
महापालिकेकडून अशा प्रकारे बॅनर लावणाऱ्यांचा तपास करत संबंधित बॅनर लावणाऱ्यांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने ही आक्रमक भूमिका घेण्यात आली असून, शहराचे विद्रुपीकरण होऊ नये या हेतूने ही कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.