Poshan Aahar : विद्यार्थांना दिलेल्या पोषणतत्व चॉकलेटमध्ये अळ्या; जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

Dharashiv News : माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. तर प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आता ज्वारी, बाजरीपासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार दिले जातात
Poshan Aahar
Poshan AaharSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: शालेय विद्यार्थाना माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत पोषण आहार दिला जात असतो. यासोबतच पोषणतत्व चॉकलेट देखील दिल्या जातात. मात्र हा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे आढळून येत असते. त्याचा प्रमाणे शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषणतत्व असलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत समोर आला आहे. 

माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात असतो. तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आता ज्वारी, बाजरी पासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार (चॉकलेट) दिले जातात. जिल्हा परिषद शाळांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सदरील मिलेट न्यूट्रेटिव्ह बारचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र या पुरवठा झालेल्या मालाच्या क्वालिटीबाबत काहीही तपासणी होत नसल्याचे समोर येत आहे. 

Poshan Aahar
Bribe Case : दोन हजाराची लाच घेणे पडले महागात; पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल, नरडाणा पोलीस स्थानकात खळबळ

चॉकलेट बारमध्ये निघाल्या अळ्या 

दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत काल पोषणतत्व असलेल्या चॉकलेटचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. मुलांनी हि चॉकलेट घरी जाऊन फोडली असता यात अळ्या आणि किडे तसेच बुरशी लागल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. यानंतर सदरचा प्रकाराबाबत पालकांनी लागलीच शाळेत येऊन मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिली. अन्य चॉकलेट बार देखील फोडण्यात आले. 

Poshan Aahar
Nagpur Crime : चक्क केसाच्या ट्रीटमेंट खर्चासाठी करायचा दुचाकी चोरी; नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात

वरिष्ठाना पाठविणार अहवाल 

आळ्या, किडे निघाल्याबाबत पालकांची तक्रार आल्यानंतर पुरवठा करण्यात आलेल्या चॉकलेटची तपासणी केली. यामधील निम्मे चॉकलेटमध्ये अळ्या असल्याचे निदर्शनास आले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांकडून चॉकलेट वाटप बंद करण्यात आले. दरम्यान याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com