Maratha Aarkshan: तिरडी आंदोलन करत सरकारचा केला जाहीर निषेध; काढली सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Dharashiv News : तिरडी आंदोलन करत सरकारचा केला जाहीर निषेध; काढली सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
Maratha Aarkshan
Maratha AarkshanSaam tv

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आठवडाभरापासून आंदोलन सुरु आहे. राज्यभरात या (Dharashiv) आंदोलनाचे पडसाद अधिक तीव्र होत चालले आहेत. मात्र राज्य सरकारकडून अद्याप निर्णय घेतला (Maratha Aarkshan) जात नसल्याने याचा निषेध म्हणून धाराशिवमध्ये राज्य सरकारचा निषेध करत प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. (Maharashtra News)

Maratha Aarkshan
Malaria Viral: मलेरियाच 'डेंजरस'; गोंदियात दोन जणांचा बळी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत तिरडी आंदोलन केले. छञपती शिवाजी महाराज चौकातुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरडी घेवुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरडी जाळुन घोषणाबाजी (Maratha Reservation) करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.

Maratha Aarkshan
Nandurbar News: मृत्यूनंतरही मरण यातना; अंत्यसंस्कारासाठी दोर लावून करावी लागते नदीपार

फडणवीसांची गाडी पेटविण्याची इशारा 

दरम्यान मराठा आरक्षणासाठी एवढी आंदोलन होत असताना ही सरकारला जाग येत नसल्याने मराठा समाजाने संताप व्यक्त केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ११ सप्टेंबरच्या संभाव्य धाराशीव जिल्हा दौऱ्याला विरोध करत उपमुख्यमंत्री फडणवीस धाराशिवमध्ये आले; तर त्यांची गाडी अडवून पेटवून देण्याचा थेट इशारा आंदोलकांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com