भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही; धनंजय मुंडेंचा घणाघात

ED पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSaam TV
Published On

कैलास चौधरी -

उस्मानाबाद : 'जगाला खऱ्या लोकशाहीचे दर्शन कोणी घडवून दाखवले असेल तर आदरणीय पवार साहेबांनी (Sharad Pawar) जगाला दाखवलं 64 आमदारांचे मुख्यमंत्री झाले 54 आमदारांचे उपमुख्यमंत्री झाले 44 आले मंत्री झाले आणि 105 वाले विरोधी पक्षात बसले. नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले' असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं आहे. तसंच त्यांनी भाजपवरती जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले, भाजपच्या (BJP) अंगातला माज अजूनही गेलेला नाही. भल्या भल्यांच्या मागे इन्कम टॅक्स काय काय ED ची तर इज्जत ठेवली नाही ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त असं म्हणत त्यांनी ईडीवर टीका केली. तसंच संविधानाने आपल्याला अधिकार दिलाय लिहायचा, बोलायचा खायचा पण संविधान पायदळी तुडवायच काम आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च संविधानिक पदावर बसलेला माणूस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. ज्यांना आम्ही देव मानतो त्या विचारावर वार करायचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Dhananjay Munde
Pune : सुरक्षा प्रोटोकॉल तोडून मोदींनी साधला पुण्यातील नगरसेवकांशी संवाद, म्हणाले...

खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्यास रयतेचे राज्य म्हणून अभिप्रेत केलं आम्ही 55 वर्षांपासून महाराष्ट्रच्या मातीला दिलं ते पवार साहेबांनी आपल्या संबंध जीवनात पवार साहेबांनी 55 वर्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हिऱ्याची किंमत दिली. जर पवार साहेबांनी मला जर विरोधी पक्षनेता केलं नसत तर कदाचित मी राजकारणात दिसलो नसतो. पवार साहेबांनी मागासवर्गीय समाजाला खुल्या मतदारसंघात निवडणूक लढवून आमदार करून बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न पूर्ण केलं अशही ते धनंजय मुंडे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com