"पिल्लू हे बीड आहे; इथे *** चटणी भरली जाते, तू ये अन् माघारी जा"

भाजप नेते किरीट सोमय्या यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे समर्थकाची अर्वाच्च भाषेत धमकी!
"पिल्लू हे बीड आहे; इथे *** चटणी भरली जाते, तू ये अन् माघारी जा"
"पिल्लू हे बीड आहे; इथे *** चटणी भरली जाते, तू ये अन् माघारी जा"SaamTvNews

मुंबई : बीड जिल्ह्यातील जगमित्र साखर कारखान्यामध्ये २५ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आजच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रार नोंदवण्यासाठी ते बीड जिल्ह्यातल्या बर्दापूर पोलीस स्टेशनला सोमय्या उद्या भेट देणार आहेत. तसेच जगमित्र साखर कारखान्याला देखील भेट देणार आहेत.

हे देखील पहा :

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना एकापाठोपाठ एक खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आधी जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहाराच्या आरोपावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे कुटुंबीय आयटी च्या रडारवर आल्याचे आपण पाहिले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख व हसन मुश्रीफ या राष्ट्रवादीच्या दोन मातब्बर नेत्यांना ईडीचा धसका घ्यावा लागला आहे. आता ईडीच्या रडारवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आले आहेत. जगमित्र शुगर मध्ये २५ कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी ईडीकडे मुंडेंविरोधात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीसोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील ईडीकडे जमा केल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे.

"पिल्लू हे बीड आहे; इथे *** चटणी भरली जाते, तू ये अन् माघारी जा"
ब्रेकऐवजी ऍक्सीलेटर दाबला; चारचाकी विहिरीत पडून महिलेचा मृत्यू!
"पिल्लू हे बीड आहे; इथे *** चटणी भरली जाते, तू ये अन् माघारी जा"
बॉयफ्रेंडसोबत लग्नासाठी घरच्यांचा विरोध; तरुणीने रचला अपहरण-बलात्काराचा बनाव! (Video)

सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात मंत्री धनंजय मुंडे व जगमित्र साखर कारखान्याविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली स्लीप नाकारली होती. जगमित्र साखर कारखान्यामध्ये २५ कोटीहून अधिकचा गैरव्यवहार झाल्याचा आरॊप सोमय्या यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमय्या उद्या बीडमध्ये जाणार आहेत.

मात्र, सोमय्या उद्या बीडला येणार आहेत, यावरून धंनजय मुंडेंसोबत असलेला फोटो व्हाट्सअँप च्या डीपीला ठेवून एका व्यक्तीने भाजप नेते किरीट सोमय्या यांना अतिशय अर्वाच्च भाषेत मेसेज करत धमकी दिली आहे. त्यामुळे यावरून आता वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com