''कुठलेही समाज एकमेकांच्या समोर उभे राहतील, अशी परिस्थिती निर्माण होणे योग्य नाही. मी ओबीसी समाजाला आश्वस्त करतो की, कुठल्या ही परिस्थिती राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही'', असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
आज जालन्यात ओबीसी समाजची एल्गार सभा झाली. ज्याला मंत्री छगन भुजबळ यांनी संबोधित केलं. तर सांगलीत मराठा समाजाची सभा झाली. या सभेला मनोज जरांगे पाटील यांनी संबोधित केलं. यावरच आपली प्रतिक्रिया देताना फडणवीस असं म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात संकल्पबद्ध आहोत. मुख्यमंत्री यांनी याबाबत स्पष्ट शब्दात घोषणा केली आहे. पण त्याच वेळी कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होईल, असे निर्णय राज्य सरकार घेणार नाही. (Latest Marathi News)
ते म्हणाले की, ''यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आश्वस्त केलं आहे, म्हणून अशा प्रकारची शंका मनातून काढून टाकावी आणि महाराष्ट्रात शांतता कशी नांदेल, असा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करू.''
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद पेटला असून दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत आहेत. आज जालन्यातील सभेत भुजबळ म्हणाले की, ''माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नका.'' तर सांगलीतील सभेत जरांगे पाटील म्हणाले की, 'भुजबळ यांचं वय झालं आहे. त्यामुळे असं होत आहे. पण आम्ही त्यांना महत्व देणार नाही.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.