अहमदनगर: येणाऱ्या आषाढी एकादशीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) मुख्यमंत्री असतील आणि तेच महापूजा करतील असा विश्वास भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे -पाटील यांनी व्यक्त केला. आज विखे पाटील अहमदनगरमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. (Devendra Fadnavis Latest Marathi News)
'विश्वास घाताने स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) आणि आज तेच विश्वास घाताची भाषा करत आहेत, त्यांना ते शोभत नाही. सत्तेतून ते पायउतार होतील असा विश्वास सामान्य जनतेच्या मनात आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. असंही राधाकृष्ण विखे -पाटील म्हणाले. येणाऱ्या आषाढीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) मुख्यमंत्री असतील आणि तेच महापूजा करतील असा विश्वास आमच्या मनामध्ये आहे असं मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.(Radhakrishna Vikhe Patil News)
राम शिंदे (Ram Shinde) यांची विधान परिषदेपदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर मध्ये भव्य सत्कार करण्यात आला. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राधाकृष्ण विखे-पाटील बोसत होते.
शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन बहुमत चाचणीची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
काल दिवसभर देवेंद्र फडणवीस (Devendra Fandavis) दिल्लीमध्ये होते. ते दुपारी मुंबईत आले आणि आता थेट राजभवनावर गेल्यामुळे भाजप आता सत्तासंघर्षामध्ये उघडपणे सामील झाल्याचं बोललं जात आहे. शिवाय भाजपकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांना बहुमत चाचणी बद्दलचे पत्र दिलं असून यासाठीच हे शिष्टमंडळ राजभवनात पोहचले असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.