गोव्यात २१ जागा जिंकू; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

"आप तृणमूल ह्यांना लोकांनी स्वीकारले नाही"
 devendra fadnavis
devendra fadnavis Saam Tv
Published On

प्राची कुलकर्णी

गोवा - आमचं सरकार नक्की येईल काही ठिकाणी चुरशीच्या लढाई आहे. पण आम्ही कंफर्टेबल आहोत असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. ते साम टिव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

साम टिव्हीच्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना शेवटचे ४८ तासात कल दिसतो असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर फडणवीस म्हणले की, आमचा अनुभव असा आहे ज्या ठिकाणी पंतप्रधानांची सभा होते त्यावेळेस एक मोठा स्विंग येतो आणि त्याचा शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला फायदा मिळतो. आता जे काही मी गोव्यामध्ये बघत आहे त्यावरून मला असं वाटतं की निश्चित आमचं सरकारी येईल आणि काही ठिकाणी चुरशीच्या लढाई आहे पण आम्ही कंफर्टेबल आहोत असे ते म्हणले. (Devendra Fadnavis on Goa Election)

हे देखील पहा -

पुढे ते म्हणले की, आम्हाला बहुमत मिळेल भाजपला २१ जागा मिळतील. काँग्रेस क्रेडिबिलिटी खूप कमी झाली आहे आणि काँग्रेस आता फक्त Polarisation च्या भरोश्यावर निवडणूक लढवण्याचा पर्यंत करत आहे. आप पार्टी आहे किंवा तृणमूल ह्यांना लोकांनी स्वीकारले अस दिसत नाही. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी तृणमूल बरोबर गेल्याने त्यांच्या कोआर मतदारांमध्ये नाराजी आहे.

 devendra fadnavis
खळबळजनक..फेसबुकवरून मैत्री करत नाबलीक तरुणीवर सामूहिक अत्‍याचार

पुढे फडणवीस म्हणले की, गोव्यात मोदी बरोबरचे सरकार येईल बाहेरचे लोक नक्की आहे, जे आले त्यांना आज म्हणू शकत नाही तुम्ही बाहेर जा. ते भाजप आमदार आहेत त्यांना तिकीट दिली. जेव्हा सरकार बनवता तेव्हा कोणी आक्षेप घेत नाही मग निवडणुकीत का आक्षेप का?त्याला अर्थ नाही. सरकार बनवताना compromise करावं लागलं पण त्यानंतर स्टेबल सरकार दिले. तेव्हा असे निर्णय घ्यावे लागतात. मोदींवर गोव्याच्या लोकांचा विश्वास आहे. त्याचा एक फायदा आम्हाला मिळेल. नरेंद्र मोदी यांच्या सोबत काम करेल असं सरकार आपण गोव्यात तयार करू असे देखील ते म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com