Latur: नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एसीबीने सापळा रचून टिपरसे यांना १५ हजारांची लाच स्वीकारताना पंचा समक्ष रंगेहाथ पकडले.
Latur: नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
Latur: नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले Saam Tv
Published On

लातूर - जमीन आणि बँकेच्या वाद प्रकरणात जमीन मालकाकडून १५ हजारांची लाच मागणाऱ्या लातूर (Latur) जिल्ह्यातील चाकूर येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( Anti Corruption Bureau) पथकाने रंगेहाथ पकडले. (Deputy Tehsildar Caught red handed while accepting bribe)

हे देखील पहा -

तक्रारदार यांच्या जमिनीवर आई आणि बहिणीचे हिस्से वाटणी असून, सदर जमिनीवर पूर्वीचे बँकेचे कर्ज आहे. सदर जमिनीवर बँकेचा बोजा असल्यामुळे या जमिनीच्या फेरफारास बँकेमार्फत लेखी अर्ज करून आक्षेप नोंदविण्यात आला होता. सदर आक्षेप अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देऊन जमिनीच्या व्यवहारात मदत करण्यासाठी येथील नायब तहसीलदार शेषेराव शिवराम टिपरसे यांनी १५ हजार रुपयांची लाच (bribe) मागितली असता सदर तक्रारदाराने २७ डिसेंबर रोजी एसीबीकडे तक्रार नोंदविली. दरम्यान, एसीबीने सापळा रचून टिपरसे यांना १५ हजारांची लाच स्वीकारताना पंचा समक्ष रंगेहाथ पकडले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com