Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: '...शौक है!' समृद्धीच्या पुढील टप्प्याचं उद्घाटनावेळी फडणवीसांचं सूचक वक्तव्य, रोख नेमका कुणाकडे?

Samruddhi Mahamarg Second Phase: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले.
Devendra Fadnavis news
Devendra Fadnavis news saam tv

Shirdi News: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा (Samruddhi Mahamarg Second Phase) शिर्डी-भरवीर आजपासून सुरु झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमावेळी फडणवीस यांनी कवीतेच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला. 'ज्या गावात त्यांनी सभा घेऊन आम्ही महामार्ग होऊन देणार नाही असे सांगितले. त्याच गावातील जमीन पहिली अधिग्रहण झाली.', अशी टीका फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis news
Samruddhi Highway: शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते 'समृद्धी'च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण; ६०० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला

देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना सांगितले की, 'अनेकांना हे स्वप्न वाटायचं, अनेकांना घोषणा वाटायची. काहींना वाटले हा महामार्ग पूर्ण होणार नाही. पण मला पूर्ण विश्वास होता आणि माझ्यासोबत मुख्यमंत्र्यांना विश्वास होता. हे काम रेकॉर्ड टाईममध्ये पूर्ण करुन दाखवू हा आमचा विश्वास होता आणि ते पूर्ण झाले.' 'अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजिलो का शौक है, और मुझे रास्ते बनाने का', अशी कवीता करत फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. (Breaking News)

'समृद्धी महामार्गाला अनेकांनी विरोध केला. त्यावेळी सोबत असलेले उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये सभा घेतली आणि महामार्ग होऊ देणार नाही, एक इंच जमीन देणार नाही असे सांगितले होते. शरद पवार यांनी देखील नगरमध्ये बैठक घेऊन हे शक्य नसल्याचे सांगितलं होते. पण ज्या गावात यांनी सभा घेऊन सांगितले आम्ही महामार्ग होऊन देणार नाही. त्याच गावात जाऊन लोकांनी आम्ही जमीन द्यायला तयार आहोत अशा प्रकारचे पत्र आम्ही जमा केले. त्यांनी सभा घेतलेल्या गावातील लोकांनी सर्वात आधी जमीन दिली. उद्धव ठाकरेंनी विरोध केला त्याच गावातील जमिनी पहिली अधिग्रहण झाली.', असे सांगत फडणवीस यांनी ठाकरे आणि पवारांवर टीका केली.

Devendra Fadnavis news
Maharashtra Politics: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने आखला मास्टर प्लॅन; शिंदेंच्या शिवसेनेलाही धक्का बसणार?

उद्धव ठाकरेंनी पुढे सांगितले की, 'जेव्हा नवीन प्रकल्प होत असतो तेव्हा त्याला विरोध होत असतो. पण या विरोधातच्या काळात तुम्ही जर प्रकल्पाच्या बाजूने उभं राहिला तर या महाराष्ट्राचे कल्याण होऊ शकते. समृद्धीसाठी शेतकऱ्यांनी साथ दिली. गावकऱ्यांनी साथ दिल्याने हा महामार्ग झाला. समृद्धी महामार्ग राज्यातील 15 जिल्ह्यांचे भाग्य बदलणार आहे.' (Latest Political News)

तसंच, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना स्पीड कमी ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की,' 150 च्या स्पीड आहे. आपल्याला 120 ची परवानगी आहे. पण आपण स्पीड कमी ठेवा. आपला जीव अधिक महत्वाचा आहे त्यामुळे स्पीड कमी करा.', असे आवाहन त्यांनी केले आहे. 'नागपूर गोवा हा महामार्ग तयार झाल्याने मराठवाड्याचा खूप विकास होईल आणि चित्र बदलेल, असे सांगत 'आम्ही फायली अडवणारे आणि त्यावर बसणारे आम्ही नाहीत.', असं देखील त्यांनी यावेळी सांगितले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com