नागपूरात डेंग्यूचा डंख; कोरोनाचा प्रभाव कमी असताना डेंग्यूची धास्ती

नागपूर जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात 370 ऍक्टिव्ह रुग्ण असून ६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
नागपूरात डेंग्यूचा डंख; कोरोनाचा प्रभाव कमी असताना डेंग्यूची धास्ती
नागपूरात डेंग्यूचा डंख; कोरोनाचा प्रभाव कमी असताना डेंग्यूची धास्तीSaam Tv News

नागपूर - जिल्ह्यात एकीकडे कोरोना (corona) रुग्णांची संख्या कमी झाली असताना दुसरीकडे मात्र डेंग्यू (dengue) आजाराची दहशत वाढत चाललीय. जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढलीय. सध्या स्थितीत जिल्ह्यात 370 ऍक्टिव्ह रुग्ण असून सहा रुग्णांचा मृत्यु झालाय. त्यामुळं शासकीय रुग्णालयात डेंग्यू रुग्णांसाठी पाच वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. (dengue cases increasing in nagpur, six dead)

हे देखील पहा -

नागपूरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भयानक परिस्थिती होती. या परिस्थितीतुन आता काहीसं नागपूर बाहेर पडलंय. शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात आहे. मात्र, आता नवीन संकट उभं राहिलंय. जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप वाढत चाललाय. पावसाळ्यामुळं शहरातील अनेक भागात पाणी साचलंय. तसंच अनेक घरांच्या छतावर असलेल्या अडगळीत वस्तूंमध्ये पाणी साचल्यानं डेंग्यूचे डास वाढलेत. त्यामुळं रुग्णांची संख्या वाढत चालली असून सध्या जिल्ह्यात 370 रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालयात पाच वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत.

नागपूरात डेंग्यूचा डंख; कोरोनाचा प्रभाव कमी असताना डेंग्यूची धास्ती
गालिचा रांगोळी सातासमुद्रापार; पाचोऱ्याच्‍या शितल पाटील कलाकृती स्पेनमधील महोत्सवात

शहरातील स्लम वस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक आहेत. मात्र, यावर प्रशासन फार काही उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळं प्रशासनानं गांभीर्यानं उपाययोजना करून डेंग्यूवर मात करण्याची गरज आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com