Mumbai Gokhale Bridge : अंधेरीचा गोखले पूल पाडण्यास सुरुवात, या तारखेपर्यंत रात्री ४ तासांचा मेगाब्लॉक

७ नोव्हेंबर २०२२ पासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आला होता.
Mumbai Gokhale Bridge
Mumbai Gokhale Bridgeसंजय गडदे

संजय गडदे

Mumbai Gokhale Bridge : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्यामुळे तो पाडण्याचा अखेर निर्णय घेण्यात आला आहे. पूल तोडण्याच्या कामास प्रत्यक्षात काल मंगळवारी रात्रीपासूनच सुरुवात झाली आहे. १३ तारखेपर्यंत पूल पाडण्याचे काम केले जाणार आहे. रात्रीच्या वेळेस चार तासाचा मेगाब्लॉक घेऊन या पुलाचे तोड काम केले जाणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेने रेल्वे वाहतुकीच्या वेळापत्रकात देखील बदल केला आहे. या तोडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात पोकलेन, जेसीबी डंपर सोबतच मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ देखील उपलब्ध करून दिले आहे. (Latest Gokhale Bridge News)

७ नोव्हेंबर २०२२ पासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आला होता. रेल्वे रुळावरील पुलाचा भाग हटवण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने तब्बल २० तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेत प्रत्यक्षात रात्रीपासून या तोडकामास सुरुवात केली आहे. या ब्लॉक दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रात्री १२.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत तर हार्बरच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर रात्री १२.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे.

Mumbai Gokhale Bridge
Gondia News: एकाच रेल्वे पटरीवर आल्‍या दोन रेल्वे; मोठी दुर्घटना टळली

गोखले पूल साल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. साल २०१९ मध्ये मुंबईतील हिमालय पुलाची दुर्घटना घडली. त्यानंतर सर्वच पुलांचे ऑडिट झाले. यामध्ये गोखले पुल दुरुस्त करण्यास सांगण्यात आले होते. मात्र नंतर दोन वर्षे हे काम करता आले नाही. पुल धोकादायक झाल्याने वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला. अशात आता या पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com