निंदनिय|प्रांताधिकाऱ्याकडून महिला तलाठीकडे शरीर सुखाची मागणी!

प्रांताधिकाऱ्यानं वारंवार फोन करून घरी बोलावून शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला पीडित महिलेने केला आहे.
निंदनिय|प्रांताधिकाऱ्याकडून महिला तलाठीकडे शरीर सुखाची मागणी!
निंदनिय|प्रांताधिकाऱ्याकडून महिला तलाठीकडे शरीर सुखाची मागणी!Saam Tv

नाशिक : प्रांताधिकाऱ्यानं शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोपAllegations महिला तलाठीकडून करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातीलNashik district येवल्यातYevale हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित पीडित महिला तलाठीच्या तक्रारीनंतर अखेर येवला शहर पोलीस ठाण्यातPolice Station प्रांताधिकारी सोपान कासारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Demand for bodily pleasure from Officer to Talathi

हे देखील पहा-

तलाठ्यांच्या बदलीवरून हा सर्व प्रकार घडल्याचं पीडित महिला तलाठी यांचं म्हणणं आहे. येवल्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांनीOfficer तलाठ्यांच्या केलेल्या बदल्या आधीचं वादात सापडलेल्या असून काही तलाठ्यांनी या विरोधात थेट मॅटमध्ये धाव घेतली आहे. मॅटनेही या निर्णयास 23 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. असे असताना प्रांताधिकाऱ्यानं वारंवार फोन करून घरी बोलावून शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला पीडित महिलेनेvictim woman केला आहे, तर अन्य एका तलाठी महिलेनं प्रांताधिकाऱ्यानं पैशांची मागणी केल्याचा आरोप केल्यानं महसूल विभागातDepartment of Revenue खळबळ उडाली आहे.

निंदनिय|प्रांताधिकाऱ्याकडून महिला तलाठीकडे शरीर सुखाची मागणी!
पवारांचे ओबीसी प्रेम अचानक का उफाळले- गोपीचंद पडळकरांचा सवाल

तलाठी विरूध्द उपविभागीय अधिकारी हे प्रकरण सध्या येवला तालुक्यात चर्चेचा विषय बनले असतांनाच महिला तलाठीने केलेले गंभीर आरोप चर्चेचा विषय ठरला होता. या महिला तलाठीने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्यानंतर त्यांनी आपली आपबिती कथन करत पोलीसांकडे धाव घेत थेट तक्रार अर्ज केला. त्यानंतर पोलीसांनी ही कारवाई करत संबंधित प्रांताधिकाऱ्यावर विरोधात गुन्हा दाखलFiled a crime केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com