Delhi High Courts Decision: मृत्यू अगोदर एखाद्या व्यक्तीला भेटल्यास त्यानेच खून केला असं होत नाही : न्यायालयाची टिप्पणी

Delhi News : आता पुराव्यांअभावी या दोघांची निर्दोष सुटका केली आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेत दोघांची निर्दोष मुक्तता केलीये.
Delhi High Courts Decision
Delhi High Courts Decisionsaam tv

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याआधी ती व्यक्ती शेवटी ज्या व्यक्तीला भेटली त्याच व्यक्तीने हत्या केली असं होत नाही. शेवटी एकत्र दिसणे म्हणजे त्यानेच हत्या केली असं होत नाही, अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात केली आहे. तसेच २७ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये.

Delhi High Courts Decision
Crime News: प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, नंतर मृतदेहाशेजारीच केलं भयानक कृत्य; निर्दयी पत्नी गजाआड

२३ वर्ष शिक्षा भोगली

एका महिलेच्या हत्येप्रकरणी २ आरोपींवर याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांनी २३ वर्ष शिक्षा देखील भोगली. त्यानंतर आता पुराव्यांअभावी या दोघांची निर्दोष सुटका केली आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेत दोघांची निर्दोष मुक्तता केलीये.

नेमकं प्रकरण काय?

1997 मध्ये एका महिलेची हत्या झाली. या हत्येप्रकरणी विशेष कुमार आणि रामनाथ यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला होता. हे दोघेही मृत महिलेसोबत शेवटचे दिसले होते.

मृत पावलेली महिला विशेष कुमार आणि रामनाथ यांच्यासोबत एकाच ठिकाणी नोकरी करत होती. नोकरी करताना ती त्यांच्यासोबत बाहेर कुठे एकत्र दिसणे यात काहीच असामान्य गोष्ट नाही. मृत्यू होण्याआधी महिलेला त्या दोघांसोबत पाहणे, म्हणजे त्यांनीच तिची हत्या केली असणार, असे होत नाही, अशी टिप्पणी देखील न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या खंडपीठाने या याचिकेवर केली आहे.

Delhi High Courts Decision
Chhatrapati Sambhajinagar Crime: लॉजमध्ये थरार! डॉक्टर प्रेयसीच्या गळ्यावर वार, प्रियकराचाही आत्महत्येचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com