कल्याण : खोणी तळोजा राज्य महामार्गावर Highway नजीक असलेल्या चिरड Chirad गावचा पूल हा धोकादायक झाला आहे. या पुलाचे संरक्षण कठडे नदी River पात्रात कोसळत आहेत. या विषयावरती बोलताना स्थानिक भाजपा आमदार MLA गणपत गायकवाड यांनी या पुलाच्या कामाल दिरंगाई केल्या प्रकरणावरून शिवसेनेवरती टीका केली आहे. “पुलाच्या कामासाठी निधी मंजूर झालेला आहे, मात्र राजकीय श्रेय घेण्यासाठी पुलाच्या कामाला दिरंगाई आहे” असा आरोप आमदार गायकवाडांनी केला आहे. Delay in construction of Chirad village bridge to get political credit
कल्याण पूर्वेतील मलंगगड भागात असलेल्या चिरड गावचा पूल हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा पूल थेट ग्रामीण भागाला राज्य महामार्गाशी जोडत असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
मात्र असं असताना या पुलासाठी आणि रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमार्फत या कामाला मंजुरीसुद्धा मिळाली आहे. मात्र राजकीय स्वार्थापोटी या पुलासह रस्त्याच्या कामाला दिरंगाई केली जात असल्याचा आरोप भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. तसेच गायकवाड यांनी सांगितले की निधी मंजूर कोणी करुण आणला, निधी मंजूर असून सुद्धा श्रेयवादासाठी पुलाचे काम सुरू केले नाही. श्रेयवादासाठी कोणाचाही जीव जाऊ नये. तसेच राज्य शासनाने पुलाला त्याच जे नाव द्यायचं आहे ते नाव द्यावे पण पुलाचे काम सुरू करावे असेही गायकवाड म्हणाले आहेत.
Edited By- Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.