Deepak Kesarkar: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात भाजपा आक्रमक; नेमका विषय काय?

Eggs In School: निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येनं कडधान्याची पाकीट पाठवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरड धान्यावरती विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsaam tv
Published On

Deepak Kesarkar Vs BJP:

शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी खिचडी, घुगऱ्या, दूध, अंडी असे पदार्थ दिले जातात. मात्र यावरून आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मध्यान भोजनात (मधल्या सुट्टीतील जेवणात) विद्यार्थ्यांना अंडी वितरित करण्याच्या निर्णयाला भाजप जैन सेलने तीव्र विरोध केला आहे.

Deepak Kesarkar
School Bus Accident: स्कुलबसचा अपघात; महिला कर्मचारी जखमी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

भाजप जैन सेलकडून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विरोध करत कडधान्याची पाकीटे पाठवण्यात आलीत. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिसमधून मंत्री केसरकर यांना ही कडधान्याची पाकीटे पाठवली गेली आहेत. मध्यान भोजनात (मधल्या सुट्टीत) विद्यार्थ्यांना अंडे वितरित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा, अशी मागणी भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी केलीये.

निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येनं कडधान्याची पाकीट पाठवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरड धान्यावरती विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. याला मंत्री दीपक केसरकर घाबरतात का? असा सवाल देखील आवेळी भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी उपस्थित केला आहे.

भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील याबाबत पत्र लिहिलं आहे. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विद्यार्थाच्या पोषण आहारात 'अंडी' चा समावेश केला आला आहे. मात्र या निर्णयाबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करत आहोत. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि विविध पंथ संप्रदायांच्या प्रमुखांनी व घटकांनी देखील याबाबत आमच्याकडे कडाडून विरोध व्यक्त केला आहे. त्यामुळे आपण हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी आमची मागणी आहे.

Deepak Kesarkar
Pune Crime News : खूनाचा संशय, पुण्यातील तडीपार गुंडास जाधवनगर परिसरातून अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com