नांदेड: नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यामधील शहापूर येथे वीज वितरण कर्मचाऱ्याचा (employee) विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढून काम करत असताना हा अपघात (Accident) घडला आहे. ज्ञानेश्वर ताटे असे या वीज वितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे. या अपघातानंतर बराच वेळ ज्ञानेश्वर ताटे यांचा मृतदेह खांबावर लोंबकळत होता.
हे देखील पहा-
वरिष्ठ तंत्रज्ञ असणारे ज्ञानेश्वर ताटे विजेच्या खांबावर काम करत होते, परंतु, अचानक वीज प्रवाह (Power flow) सुरु झाल्याने शॉक (Shock) लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे काम करत असताना याकरीत फोन परमिट घेण्यात आले होते. तरी देखील वीज प्रवाह कसा सुरु झाला, याचं नेमकं कारण काय? याची चौकशी होणे गरजेचे आहे. मृत्यू झाल्यावर या घटनेची दखल घेऊन मृतदेह खांबावरून खाली घेणे गरजेचे होते. पण या अपघातानंतर खूप वेळ ज्ञानेश्वर ताटे यांचा मृतदेह खांबावर लोंबकळत होता.
यामुळे वीज वितरण विभागाचा असंवेदनशीलपणा दिसून येत होता. वीज कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याची ही २ महिन्यामधील दुसरी घटना आहे. या अगोदर ३ फेब्रुवारी दिवशी वीज पुरवठा करणाऱ्या डीपीवर काम करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ३ फेब्रुवारी दिवशी हदगाव तालुक्यातील मौजे रावणगाव शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. अवधूत नागोराव शेट्टे (वय ५०) असे या मृत वीज कर्मचाऱ्याचे नाव आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.