राजेश भोस्तेकर -
रायगड : जंगली जनावर आणि नदीतील माशांच्या शिकारीसाठी (Hunters) तयार केलेला गावठी हातबॉम्ब (Grenade) हाताळताना स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू (Death) तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी माणगाव तालुक्यात निजामपूर येथे घडली. संदेश चौहान (40) हा जागीच ठार झाला असून मजीनाबाई चौहान (40) ही किरकोळ तर सत्यम चौहान (10) वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर पनवेल (Panvel) येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावरती त्यांना घटनास्थळी एका झाडावर 25 हातबॉम्ब आणि गंधक सापडले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हे देखील पहा -
मयत संदेश आदिवासी चौहान हा आपली पत्नी मजिनाबाई संदेश चौहान आणि मुलगा सत्यम संदेश यांच्यासह पोटापाण्यासाठी माणगाव तालुक्यातील (Mangaon Taluka) मशीदवाडी गावच्या हद्दीत धामणी नदी शेजारी शेतातील माळरानात उघड्यावर राहत होता. चौहान कुटूंब हे मूळचे मध्यप्रदेशमधील असून पारधी समाजाचे आहेत. त्यामुळे शिकार करणे हा मूळ त्याचा व्यवसाय आहे. जंगली डुक्कर,नदीतील मासे (River fish) यांची शिकार करण्यासाठी संदेश हा गावठी हातबॉम्ब बनवत असे. नदीतील गोटे, गंधक, चुका याचा वापर करून हा गावठी हातबॉम्ब तो बनवत होता. या हातबॉम्बचा उपयोग करून तो शिकार करायचा. मंगळवार दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संदेश चौहान हा हात बॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला त्यामध्ये संदेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा सत्यम यास गंभीर दुखापत होऊन त्याची पत्नी माजीनाबाई यांंना देखील दुखापत झाली आहे.
घटनेतील गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचाराकरिता आणण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केल्यावर त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्यास अधिक औषधोपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आले आहे. मुलगा आणि पत्नी याच्यावर रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलिस (Raigad District Police) अधीक्षक अशोक दुधे यांनीही माणगाव उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. तर रायगड जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी त्वरित आपल्या सहकार्यांसमवेत घटनास्थळाला भेट दिली.
दरम्यान 25 गावठी हातबाँम्ब सापडलेले हे लोक मध्यप्रदेशातील पारधी समाजाचे असून शिकारीसाठी या बाँम्बचा उपयोग करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येवून आरोपींवर भादवी सहिता कलम 286,337,338 स्फोटक कायदा कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव पोलिस करीत आहेत.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.