अमरावती - शहरातील एमआयडीसी MIDC परिसरात राष्ट्रीय महामार्गा जवळ असलेल्या नेक्सा शोरूम जवळील झूडपात एक तीन वर्ष वयोगटातील बिबट मृत Death Leopard अवस्थेत सोमवारी आढळून आला. एका व्यक्तीला रस्त्याच्या बाजूने दुर्गंधी येत असल्यामुळे त्याने पाहणी केली असता बिबट असल्याचे लक्षात आले. त्याने तात्काळ याची माहिती वडाळी वन विभागाला दिली. घटनास्थळी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भूम्बर यांच्यासह इतर वन कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
हे देखील पहा -
त्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. ट्रकच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच ही घटना तीन ते चार दिवसा पूर्वी घडली असल्याचे बोलले जात आहे. मृतक बिबट्याला बांबू गार्डन येथे आणून त्या ठिकाणी डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून बिबट्याला अग्नी देण्यात आली. याच महामार्गावर बिबटच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे. या आधी सुद्धा शिकार करण्याच्या उद्देशाने एमआयडीसी परिसरात आलेल्या बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला होता.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.