सोलापूर : सोलापुरात उजनीचा पाणी प्रश्न ( Ujani Water Issue ) पुन्हा एकदा पेटला आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना मंजूर केली आहे. त्यामुळे उजनी पाणी प्रश्नाचा मुद्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सोलापूरचे (Solapur ) पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane ) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच उजनी प्रश्नावरून पालकमंत्री बदलणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. यावर सोलापूरचे पालकमंत्री तिखट प्रतिक्रिया दिली आहे. (Dattatray Bharane Latest News In Marathi )
हे देखील पाहा -
सोलापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आले होते. त्यादरम्यान पत्रकारांनी त्यांना पालकमंत्री बदलण्याचा चर्चेवर प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी 'पालकमंत्री बदलण म्हणजे काय बाजारचा भाजीपाला असतो का ?', असा प्रतिप्रश्न भरणे यांनी पत्रकारांना विचारला. त्यामुळे पालकांमत्र्यांच्या प्रतिक्रियेची पक्षीय पातळीवर कशी दखल घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.पुढे भरणे म्हणाले,''लाकडी - निंबोडी ही इंदापूर - बारामतीसाठीची योजना जुनीच आहे. त्यामुळे पाणी पळवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि येणाऱ्या काळात सोलापूरकरांच्या पाणी प्रश्नासाठी कटिबद्ध राहणार'.
दरम्यान, उजनी पाणी प्रश्नावरून अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते, 'लाकडी निंबोडी योजना ही जुनी योजना आहे. सोलापूर जिल्ह्यात लोकांचा गैरसमज काढला पाहिजे,इंदापूर तालुक्यातील लोकांचे हक्काचे पाणी इंदापूरकरांना देत आहोत'. पुढे अजित पवार म्हणाले होते, 'पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांचे पाणी इतर जिल्ह्यांमध्ये जाते. पाणी हे सर्वांचे असून वेगळी भूमिका घेऊ नये. कारण नसताना गैरसमज निर्माण न करता नवीन प्रश्नही निर्माण करू नये', असे आवाहनही अजित पवारांनी सोलापूरच्या नागरिकांना केले होते.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.