Gautami Patil On Marriage: बीडच्या पाटील घराण्याची सून होणार का? तरुणाच्या लग्नाच्या प्रस्तावावर गौतमी स्पष्टच बोलली

Marriage Proposal: काही दिवसांपूर्वी गौतमीला बीडमधील एका तरुणाने पत्राद्वारे लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता.
Gautami Patil
Gautami Patil Saam Tv

Gautami Patil: प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या आपल्या नृत्याच्या तालावर संपूर्ण महाराष्ट्राला नाचवत आहे. गौतमी आपल्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर ऐवढा चाहतावर्ग वाढला आहे की तिला पाहण्यासाठी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण गर्दी करतात. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात गौतमीचे कार्यक्रम होतात. अशामध्ये काही दिवसांपूर्वी गौतमीला बीडमधील एका तरुणाने पत्राद्वारे लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. यावर गौतमीने आतापर्यंत प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता गौतमीने या लग्नाच्या प्रस्तावावर उत्तर दिले आहे.

Gautami Patil
Gautami Patil Video: गौतमी पाटील विठुरायांच्या चरणी; हात जोडून देवाकडं काय साकडं मागितलं?

नुकताच गौतमी पाटीलने पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेत देवाला साकडं देखील घातलं. यावेळी गौतमीने माध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी बीडमधील रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला लग्नाबाबत पत्र पाठवले होते त्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे. 'तू जशी आहेस, तशी स्वीकारायला मी तयार आहे' असे या तरुणाने पत्रामध्ये लिहिले होते. यावर गौतमीने सांगितले की, 'अजिबात तसला काही विचार नाही. कोणीही काही म्हटलं तरी मी कशाला त्याकडे लक्ष देऊ.', असे स्पष्टपणे तिने सांगितलं.

Gautami Patil
BJP News : भाजपमध्ये भाकरी फिरणार? आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या फेरबदलांची शक्यता

बीडमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला काही दिवसांपूर्वी पत्र लिहून थेट लग्नाची मागणी घातली होती. 'गौतमी तुझ्या सर्व इच्छा आणि अटी मला मान्य आहे. बोल तू होते का माझी परी.." असं म्हणत या तरुणाने पत्रात आपल्या घराचा पत्ता दिला होता. तसंच, मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असे त्याने पत्रात म्हटले होते.

एका मुलाखतीत गौतमीने आपल्या लग्नासाठी कसा मुलगा हवा आहे हे बोलून दाखवले होते. त्यानंतर या रोहनने गौतमीला पत्र पाठवले होते. त्याचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पत्रामुळे गौतमीसोबत रोहन देखील चर्चेत आले होते. या लग्नाच्या प्रस्तावावर गौतमी नेमकी काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. तिने अखेर या प्रस्तावावर उत्तर देत स्पष्टपणे आपले मत मांडले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com