Govinda 2023: गोविंदाच्या अंगावर चाबकाचे फटके मारत फोडली दहीहंडी; सुधागडमधील आगळीवेगळी प्रथा

Dahi Handi News: सुधागड तालुक्यातील जांभूळ पाडा येथे अशा काहीशा विचित्र प्रथेतून दहीहंडी साजरी केली जाते.
Govinda 2023
Govinda 2023Saam TV

Dahi Handi News:

दहीहंडीच्या उत्साहाने राज्यात चौकाचौकात गोविंदांचा जल्लोष पाहायला मिळतोय. सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने आज कृष्णजन्मोत्सव साजरा करतायत. अशात सुधागड येथून एक अनोखी प्रथा समोर आली आहे. यामध्ये गोविंदाच्या अंगावर आसुडाचे फटके मारले जातायत. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दहीहंडी साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि रिती आहेत. मात्र अंगावर आसुडाचे फटके मारून दहीहंडी साजरी करणारी प्रथा तुम्ही कधी पाहिलीये का? सुधागड तालुक्यातील जांभूळ पाडा येथे अशा प्रथेतून दहीहंडी साजरी केली जाते.

Govinda 2023
Tharala Tar Mag Serial: सेलिब्रिटींचं 'ठरलं तर मग'! मीरा जगन्नाथनंतर आणखी एका कलाकारानं सोडली मालिका

अतिशय वेगळ्या प्रकारे पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. येथे गोविंदांच्या अंगात कान्होबाचे वारे येते आणि हे सर्वजण घुमायला सुरुवात करतात. महिला त्यांची पूजा अर्चा करतात आणि मग गोविंदा आसुडाचे फटके अंगावर मारून घेत गावभर फिरतात. ही परंपरा केव्हापासून सुरु झाली हे सांगता येत नाही. मात्र मागील कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपली आहे.

प्रत्येक गावात अथवा जिल्ह्यात सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही ठिकाणी कृष्णजन्मावेळी रात्री १२ वाजताच दहीहंडी फोडली जाते. कोकणातील एका गावात विहीरीवर दहीहंडी बांधून ती फोडण्याची प्रथा आहे. या सर्व प्रथांमध्ये आसुडाचे फटकेमारत दहीहंडी फोडण्याची प्रथा पाहून अनेक जण थक्क झालेत.

Govinda 2023
Dahihandi On Water Well: आला रे आला गोविंदा आला! पोरांनी थेट ४० फूट खोल विहिरीवर बांधली दहीहंडी; थक्क करणारा VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com