Nashik Crime News : नांदगाव पोलिसांच्या हातावर तुरी देत संशयिताने ठाेकली धूम

या संशयित आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
nandgaon,
nandgaon, saam tv

- अजय साेनावणे

Nandgaon Crime News : नांदगाव तालुक्यातील नाग्या - साक्या धरणावरील (nagya sakya dam) कृषी पंपासाठी वापरल्या जाणाऱ्या केबल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपीने न्यायालयातून पोलीस ठाण्यात परतल्यानंतर पोलिसांची हातावर तुरी देवून धूम ठोकल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हिरामण धोंडीबा गांगुर्डे असे या फरार झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. (Maharashtra News)

nandgaon,
Pune Nagar Highway : वाघेश्वर चौक ते लाईफलाईन हॉस्पिटलपर्यंत दोन्ही बाजूस नो पार्किंग झाेन; जाणून घ्या कारण

दरम्यान, संपूर्ण पोलीस स्थानक संशयित आरोपीच्या शोधात लागले आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत हा संशयित आरोपी मिळून न आल्याने त्यास शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले.

nandgaon,
Ashadhi Ekadashi : हिंदु - मुस्लीम ऐक्याचे प्रतिक; आषाढी दिवशीच बकरी ईद, कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय

याबाबत अधिक माहिती अशी की नाग्या - साक्या धरणातील कृषी पंपाच्या तांब्याच्या केबलची चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ७ कृषीपंपाच्या ७४ हजार रुपयांच्या केबल चोरी प्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. काल हिरामण धोंडीबा गांगुर्डे या तिसऱ्या संशयिताला पाेलिसांनी ताब्यात घेतले होेते.

nandgaon,
Pandharpur Mills Bandh News: जुलैपासून महाराष्ट्रातील 300 सुतगिरण्या राहणार बंद; संघटनेचा इशारा

या संशयितास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली होती. यास न्यायालयातून पोलीस ठाण्यात आणले असता आरोपीने पोलिसांची नजर चुकवून तेथून पळ काढला. काल रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी कर्मचारी या संशयित आरोपींची शोधासाठी मागावर होते. मात्र तो मिळून न आल्याने पोलिसांसमोर या आरोपीला शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

या संशयित आरोपीचा पोलिसांकडून (police) कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून जाण्याची घटना प्रथमच घडल्याने शहरात याविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com