Nashik Crime News: भीषण घटनेने नाशिक हादरले! भररस्त्यात वार करत तरुणाची निर्घुण हत्या; आरोपी फरार

Nashik Crime News: राज्यभरात होळीच्या सणाची धामधुम सुरू असतानाच खुनाच्या घटनेने नाशिक शहर हादरले आहे.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam tv

तरबेज शेख..

Nashik News: राज्यात होळी, धुलीवंदनाच्या सणाची धामधूम सुरू आहे. राज्यभरात होळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच खुनाच्या घटनेने नाशिक शहर हादरले आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात भररस्त्यात एका इसमाचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Nashik Crime News
Amol Mitkari : अमोल मिटकरींना खासदार व्हावसं वाटतंय, जाहीररित्या व्यक्त केली इच्छा; लवकरच पुढची दिशा ठरवणार

याबाबत अधिक माहिती अशी की, ऐन होळीच्या धामधुमीत नाशिक शहराला हादरवणारी घटना समोर आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात धारदार शस्त्राने वार करत तरुणाची निर्घुण हत्या केल्याची घटना घडली आहे. किरण गुंजाळ असे या तरुणाचे नाव असून हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Nashik Crime News
Maharashtra Politics : संजय राऊत पूर्ण वेडा झालेला माणूस; गोपीचंद पडळकर यांची टीका

दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भर रस्त्यात भीषण हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह फौजफाटा दाखल झाला. ही हत्या कोणत्या हेतूने करण्यात आली. हत्येमागे कोणते कारण होते, अशा अनेक प्रश्नांचा तपास घेण्याचे आव्हान आता नाशिक पोलिसांसमोर आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com