Crime News: निर्दयी बाप! पोटच्या लेकीचा विहिरीत फेकून घेतला जीव, धक्कादायक कारण आले समोर

श्रीदेवी जन्मजात दिव्यांग असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते.
Sangali Crime News
Sangali Crime NewsSaam tv
Published On

Sangali News: पोटच्या चार वर्षाच्या मुलीचा निर्दयी बापानेच विहरीत फेकून जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अण्णाप्पा कोळी असे या निर्दयी बापाचे नाव असून सांगली जिल्ह्यातील कुरळूपमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. तर श्रीदेवी कोळी असे या दिव्यांग चिमुरडीचे नाव आहे. या दुर्देवी घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi New Update)

Sangali Crime News
PM Narendra Modi: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळू शकतो शांततेचा नोबेल? नॉर्वेहून पुरस्कार समितीचे पथक भारतात दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील अण्णाप्पा कोळी याचे कुटुंब सध्या वाळवा तालुक्यातल्या कुरळप या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी गेल्या काही वर्षांपासून वास्तव्य आहे. त्यांना श्रीदेवी नावाची चार वर्षाची मुलगी होती. ही श्रीदेवी जन्मजात दिव्यांग असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिच्या आजारपणात कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळेच अण्णाप्पाला तिचा सांभाळ करणे कठीण होत होते.

Sangali Crime News
Amruta Fadnavis News : अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; महिलेसह एकावर गुन्हा, नेमकं काय घडलं?

याच त्रासाला कंटाळून अण्णाप्पा कोळी याने घराजवळ असणाऱ्या विहीरीत श्रीदेवी या आपल्या चार वर्षाच्या दिव्यांग मुलीला फेकून दिले. ज्यामध्ये तिचा बुडून मृत्यू झाला. मुलगी बेपत्ता झाल्याने कोळी कुटुंबाने शोध सुरू केला. यावेळी घरा जवळच्याच असणाऱ्या विहिरीमध्ये श्रीदेवीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी अण्णाप्पा कोळी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या मुलीला विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली. सध्या तो कुरळप पोलिसांनी अटक केली आहे.. (Sangali News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com