Cricket Frog चे महाराष्ट्रात दर्शन; सातारकरांचा शाेधनिंबध BNHS कडून प्रकाशित

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (BNHS) ही भारतातील प्राणिविज्ञान ,जैवविविधता क्षेत्रात संशोधन, संवर्धन काम करणारी सर्वात मोठी बिगर सरकारी संस्था आहे. हीची स्थापना १५ सप्टेंबर १८८३ रोजी झाली.
cricket frog
cricket frog
Published On

कोल्हापूर : महाराष्ट्रातील संशोधकांनी नुकतेच काेल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पाटणे गावात प्रथमच गोव्यातील क्रिकेट फ्राॅग (बेडूक) मिनरव्हारीया गोएमची पाहिला. प्राणीशास्त्राचे प्राध्यापक ओंकार यादव, तेजस पाटील (दहिवडी काॅलेज) आणि अमृत भोसले (एसजीएम काॅलेज) यांनी या बेडकाच्या प्रजातीवर संशोधन केले.

सातारा जिल्ह्यातील मेढा गावातील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख ओंकार यादव म्हणाले मिनरव्हारीया गोएमची मला सन २०१५ मध्ये पहिल्यांदा दिसला. परंतु आण्विक डीएनए विश्लेषण पूर्ण न झाल्यामुळे मी त्याची नोंद करू शकलो नाही.

cricket frog
काेयना, अंबा घाटात खेकड्यांच्या ४ नव्या प्रजाती : तेजस ठाकरे

सन २०१७ मध्ये या बेडकाच्या प्रजातीचे वर्णन प्रथम गोवा (goa) राज्यातील सुर्ला गावात करण्यात आले होते. आता महाराष्ट्रात (maharashtra) प्रथमच याची नोंद करण्यात आली आहे. मिनरव्हारीया गोएमची या बेडकाचे सध्या ३७ वैध प्रजाती आहेत. ह्यांना सामान्यतः क्रिकेट प्राॅग (बेडूक) म्हणतात आणि फायलोजेनेटिक अभ्यासावर आधारित चार भिन्न प्रजातींच्या गटांमध्ये विभागले गेले आहेत जे मिनर्वर्या निलागिरका (Minervarya Nilagiraca), मिनरव्हारीया रुफेसेन्स (Minervarya rufescens), मिनरव्हारीया सह्याद्रिस (Minervarya sahyadris) आणि मिनरव्हारीया सह्याद्रेन्सिस (Minervarya syhadrensis) आहेत.

Minervarya Goemchi त्याच्या वैशिष्ट्यांनुसार M. Nilagiraca मध्ये बसते. या मोठ्या आकाराच्या बेडकाची प्रजाती मूळची गोव्यातील सुर्ला गावातील असून शाहूवाडीतील पाटणे गावात त्याची नोंद करण्यात आली आहे.

आमचा शोधनिबंध बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (Bombay Natural History Society) २९ डिसेंबर रोजी प्रकाशित केलेल्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला. अधिक वैज्ञानिक तपशील शोधण्यासाठी बेडूकांच्या प्रजातींचा तपशीलवार अभ्यास करणे आवश्यक आहे असेही यादव यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com