Kolhapur Crime : अनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या; २२ वर्षांनी मिळाली पत्नीला शिक्षा

कोर्टाने मृत व्यक्तीच्या पत्नीसह ८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime News Saam TV

रणजित माजगांवकर, साम टिव्ही

Kolhapur Crime News : अनैतिक प्रेमसंबधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून काटा काढला. हत्येचा प्रकार उघड होऊ नये, म्हणून पतीचं शीर धडावेगळं करून ते वारणा नदीत फेकून दिलं. कोल्हापुरात २००१ साली हा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणी कोर्टाने मृत व्यक्तीच्या पत्नीसह ८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Crime News
Viral News : १६ वर्षीय विद्यार्थ्यावर जडलं शिक्षिकेचं प्रेम; नंतर जे घडलं ते चक्रावून टाकणारं

सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाल्याचं कळताच, आरोपीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे कोल्हापूर कोर्टाच्या बाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलीसांनी (Police) कडक बंदोबस्तात सर्व आरोपींना कारागृहात नेलं. कोर्टाच्या या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

काय घडलं होतं?

कोल्हापुरातील (Kolhapur) लाईन बाजार परिसरात राहणाऱ्या नितीन पडवळे याची दुसरी पत्नी लीना पडवळे हिचे रवी माने या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. नितीन पडवळे त्यांच्या प्रेमप्रकरणात आड येत असल्याने पतीची हत्या (Crime News) करण्याचा लॅन लीना पडवळे आणि तिचा प्रियकर रवी माने यांनी केला.

२००१ साली त्यांनी नितीन पडवळे याला कोल्हापूर जिल्ह्यातील अंबा परिसरात नेऊन त्याच्या अपहरणाचा बनाव रचला. तसंच इतर नऊ आरोपींना घेऊन या सर्वांनी नितीन पडवळची निर्गुण हत्या केली. हत्येचा प्रकार उघड होऊ नये यासाठी पुरावा नष्ट करण्यासाठी या सर्व आरोपींनी नितीन पडवळे याचं शीर धडा वेगळं करून ते वारणा नदीत फेकून दिलं.

Kolhapur Crime News
Crime News: भाऊ कामाला गेल्यावर वहिनीच्या खोलीत शिरायचा दीर; नवऱ्याला कळताच घडलं भयंकर

याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी एकूण ११ आरोपी निश्चित केले होते. मात्र या प्रकरणातील दोन आरोपी सुरुवातीपासूनच फरार झालेत तर एका आरोपीचा या कालावधीत मृत्यू झालेला आहे. या प्रकरणाची आज अंतिम सुनावणी होती. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज या प्रकरणातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

यामध्ये नितीन पडवळे यांच्या पत्नीचा देखील सहभाग आहे. या खटल्याची आज सुनावणी होणार असल्याने सर्व आरोपींचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात न्यायालय परिसरात जमले होते. या सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाल्याचं कळताच आरोपीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला प्रचंड पोलीस बंदोबसात या सर्व आरोपींना कारागृहाकडे नेण्यात आलं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com