Solapur: महिलेच्या दुष्कर्म प्रकरणी भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाला न्यायालयाचा दिलासा

श्रीकांत देशमुख यांना कोर्टात हजर राहण्याबाबतच्या अर्जावर युक्तिवाद झाला.
Solapur News
Solapur NewsSaam TV

सोलापूर : महिलेच्या दुष्कर्म प्रकरणातील सोलापूर (Solapur) भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना सोमवारपर्यंत अटक करु नका असं न्यालयाने सांगितल्याने देशमुख यांनी तुर्त दिलासा मिळाला आहे. श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल सुनावणी झाली. (Former district president of Solapur BJP Shrikant Deshmukh)

श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांना कोर्टात हजर राहण्याबाबतच्या अर्जावर युक्तिवाद झाला. कोर्टात हजर राहण्याचे नेमके कारण दिले नाही. त्यामुळे सरकार पक्षाने केलेला अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती अॅड. थोबडे यांनी केली होती.

पाहा व्हिडीओ -

या प्रकरणी अखेर देशमुख यांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दिले. देशमुख यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल सुनावणी झाली. श्रीकांत देशमुख याला कोर्टात हजर राहण्याबाबतच्या अर्जावर युक्तिवाद करण्यात आला कोर्टात हजर राहण्याचे नेमके कारण दिले नाही. त्यामुळे सरकार पक्षाने केलेला अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती अॅड. थोबडे यांनी केली असून आता या जामीन अर्जावर ८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण -

Solapur News
पवारांच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे लक्ष; मिशन ४५ साठी केंद्रीय मंत्री बारामती मुक्कामी

सोलापूर भाजपचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपाहार्य व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या व्हिडीओमधील महिलेने देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी देशमुख यांना आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com