मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येणार की काय? अशी भीती वर्तवली जात आहे. त्यातच दिवसागणिक कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता झोप उडवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. राज्यात ओमिक्रॉनच्या BA सबव्हेरियंटने शिरकाव केला आहे. राज्यात ओमिक्रॉनच्या BA.4 चे 3 आणि BA 5 सबव्हेरियंटचा एक रुग्ण आढळला आहे. (Corona Virus Latest Marathi News In Maharastra)
एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे ओमिक्रॉनच्या सबव्हेरिएंटने राज्यात शिरकाव केल्याने आरोग्य प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार मुंबईत BA.4 आणि BA. 5 व्हेरियंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. हे सर्व रुग्ण 14 मे ते 24 मे 2022 या कालावधीतील आहे. त्यातील दोन 11 वर्षांच्या मुली तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले असून या सर्व रुग्णांचे इतर तपशील देखील घेण्यात येत आहेत.
दुसरीकडे, राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. सोमवारी राज्यात 1,885 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 17, 480 इतकी झाली आहे राज्यात कोरोनाने बरे होणाऱ्यांचा दर 97.91 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर राज्यात मृत्यू दर 1.86 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईत सोमवारी दिवसभरात 1,118 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे मुंबईतील आजपर्यंतची कोरोना रुग्णांची एकूण संख्या 10,80943 वर पोहोचली आहे. तर 10,50039 एवढे रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या मुंबईत कोरोनाचे एकूण 11,331 सक्रिय रुग्ण आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.