कोरोनामुळे हॉटेल इंडस्ट्री धोक्यात; वर्षभरात १ लाखाहून अधिक हॉटेल्सला टाळे

गेल्या दीड वर्षांतील लॉकडाऊनच्या विविध निर्बंधांमुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यवसाय पुरता बुडाला आहे
कोरोनामुळे हॉटेल इंडस्ट्री धोक्यात; वर्षभरात १ लाखाहून अधिक हॉटेल्सला टाळे
कोरोनामुळे हॉटेल इंडस्ट्री धोक्यात; वर्षभरात १ लाखाहून अधिक हॉटेल्सला टाळे Saam tv news
Published On

कोरोनाचा (Corona) मोठा फटका रेस्टॉरंट आणि हॉटेल इंडस्ट्रीला (Restaurant and hotel industry) बसला आहे. दीड वर्षातील लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे राज्यातील तब्बल एक लाख रेस्टॉरंट्स आणि तीन हजार हॉटेल्सना टाळे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Corona poses a threat to the hotel industry)

कोरोनामुळे हॉटेल इंडस्ट्री धोक्यात; वर्षभरात १ लाखाहून अधिक हॉटेल्सला टाळे
अडीच महिन्यानंतर समजले डेल्टा प्लस झाल्याचे; प्रशासन सतर्क

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांतील लॉकडाऊनच्या विविध निर्बंधांमुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यवसाय पुरता बुडाला आहे.राज्यातील तब्बल एक लाख रेस्टॉरंट्स आणि तीन हजार हॉटेलना टाळे मारण्याची वेळ मालकांवर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंट्स आणि हॉटेल बंद झाल्याने या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या २५ लाख कामगारांना रोजगार गमवावा लागला आहे. तर राज्याला महिन्याला सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

राज्यात लॉकडाऊनआधी २ लाख १० हजार रेस्टॉरंट्स आणि १० हजार ५०० हॉटेल कार्यरत होते. आजघडीला रेस्टॉरंट्सची संख्या तब्बल ५० टक्क्यांनी घटली असून, हॉटेल्सच्या संख्येतही ३० टक्क्यांची घट झाली आहे. या क्षेत्रावर तब्बल ५० लाख लोकांचा प्रत्यक्ष रोजगार अवलंबून आहे. मात्र, बंद पडलेल्या रेस्टॉरंट्समुळे १४ लाख कामगारांच्या रोजगारावर दगा आली आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com