कोरोना पुन्हा वाढतोय, मास्क वापरा; मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySaam Tv
Published On: 

मुंबई : देशात आलेली कोरोनाची (Corona) तिसरी लाट आता जवळपास संपल्यात जमा आहे. मात्र, असं असलं तरीही चौथ्या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे. त्यातच राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (corona Patents) रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे राज्यातील जनतेने मास्क (Mask) वापरत रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून नागरिकांना केले. (Corona Virus In Maharastra Latest News)

CM Uddhav Thackeray
धोक्याची घंटा! 15 दिवसांत तब्बल 15 देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला होता. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून येत होती. परंतु, मुंबईमध्ये दिवसागणिक जवळपास 200 रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येईल अशी शक्यता आरोग्यतज्ञांनी वर्तवली आहे. सध्या राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांचा साप्ताहिक दर 1.59 टक्के इतका असून असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटीव्ह आढळून येत आहेत.

मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली आहे. मुंबईपाठोपाठ ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52 टक्के 68.75 टक्के इतकी वाढ झाली आहे. सध्या राज्यात फक्त एक रुग्ण व्हेटिलेटरवर असून 18 रुग्ण ऑक्सिजनवर आहे.

रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली, तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सध्या 18 पेक्षा अधिक वयाच्या 92.27 टक्के लोकांना एक डोस देण्यात आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले असून ते वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com