Maharashtra Corona News: राज्यात कोरोनाचा कहर! एकाच दिवशी आढळले ११०० नवे रुग्ण; मास्क वापरण्याचे आवाहन

Corona News Update: राज्यात कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे खबरदारी म्हणून आपण सर्वांनी मास्क लावावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
Corona News
Corona NewsSaamtv

सुशांत सावंत, प्रतिनिधी...

Maharashtra Corona News: महाराष्ट्र (Maharashtra Corona Case) आणि मुंबईत (Mumbai Corona case) वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली आहे. आज राज्यात कोरोनाचे ११०० नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाचे 25 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल कार्यरत करण्यात आले असून हे रुग्णालय प्रामुख्याने गंभीर रुग्णांना उपचार देण्याकरिता कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. (Maharashtra Corona News)

Corona News
Beed News : नापिकी, कर्जाचे ओझे अन् आईचं आजारपण; अवघ्या ३२ वर्षीय शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी संवाद साधला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी राज्यात कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे खबरदारी म्हणून आपण सर्वांनी मास्क लावावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सर्वांनी मास्क लावून काम करावे अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिल्या.

Corona News
Viral Dance Video: 'मला बाई दारूड्या भेटलाय नवरा...' गाण्यावर चिमुकल्याचा जबराट डान्स, हावभाव पाहून नेटकरीही झाले फिदा; पाहा VIDEO

यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, "आजच्या स्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत 5 हजारांहून अधिक कोविड खाटा आहेत. तर 2 हजारांहून अधिक व्हेंटिलेटर व रुग्णांना आवश्यकता पडल्यास लागणारे ऑक्सिजन करिता ६२ LMO Tanks, ३७ पीएसए प्लांट कार्यरत आहे. त्याच प्रकारे 2 हजार जम्बो आणि 6 हजार लहान सिलेंडर तयार आहेत."

आज प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात कोविड तपासणी सुविधा उपलब्ध असून एका दिवसात वैद्यकीय महाविद्यालय 30 हजारांहून अधिक कोविड चाचण्या करू शकतात. नुकतेच दिनांक 10 व 11 एप्रिल रोजी प्रत्येक महाविद्यालयात भारत सरकार च्या मार्गदर्शन सूचनेनुसार कोविड मॉक ड्रिल घेण्यात आली आहे.

तसेच ज्येष्ठ व्यक्ती यांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा. येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठाता यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. रुगणालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करुन द्यावी अशा सूचनाही महाजन यांनी दिल्या.

दरम्यान, या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. आश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह अधिष्ठाता आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com