बीड: मुस्लिम धर्माचा स्वीकार करण्यासाठी पैसे आणि मुस्लिम मुलीशी विवाह लावून देण्याचे आमिष दाखवत बीड (Beed) जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या मांडवा गावातील एका ३५ वर्षीय तरुणाने मुस्लिम धर्मात (Muslim Religion) प्रवेश केल्याचा प्रकार समोर आलाय. शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर नोटरी करून स्वखुशीने दुसरा धर्म स्वीकारल्याचे या तरुणाने ११ फेब्रुवारीला घोषणापत्र (Manifesto) लिहिले होते. मात्र त्यानंतर लगेच १७ फेब्रुवारीला दुसरा नोटरी बॉण्ड तयार केला. ज्यामध्ये लग्न आणि पैशांचे आमिष दाखवून त्याला धर्म बदलायला लावल्याचे लिहिले आहे. या तरुणाच्या म्हणण्यानुसार आता आता जेव्हा त्याने धर्मांतरणाचे (Conversion) घोषणापत्र लिहिले तेव्हा त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती असं त्याने जाहिर केलयं, त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक वळण मिळालयं. (Conversion of youth taking advantage of his mental condition...)
हे देखील पहा -
परळी (Parli) तालुक्यातील मांडवा येथील ३५ वर्षीय ज्ञानेश्वर मनोहर नागरगोजे या तरुणाने ११ फेब्रुवारीला बाँडवर जे घोषणापत्र दिले, त्यात त्याने लिहीलं की "आपण मुस्लिम धर्माचा अभ्यास केला असून आत्मचिंतन करून इस्लामची शिकवण खऱ्या अर्थाने प्रभावशाली असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय एकेश्वरवाद प्रेषित मोहंमद पैगंबर चरित्र, विश्वबंधुत्व वादाचा अभ्यास करताना मी पाईक झालो व स्वखुशीने, स्वयंप्रेरणेने भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ अंतर्गत धर्म स्वातंत्र्याचा अधिकार वापरून मुस्लिम धर्मात प्रवेश करत आहे. माझे नाव मोहंमद शाहजाद मनोहर असे बदलले आहे" असा लिखिच बाँड संबंधीत तरुणानं दिला होता.
ज्ञानेश्वरचा नावाच्या या तरुणाच्या नोटरी केलेल्या दुसऱ्या बॉंडमध्ये त्याने धक्कादायक दावा केला आहे. त्याने दुसऱ्या बॉंडमध्ये लिहिलं की, "आपण हिंदू धर्मातच असून ११ फेब्रुवारी २०२२ रोजी माझी मानसिक स्थिती ठिक नसल्याचा गैरफायदा घेऊन परळी आणि बीडच्या काही लोकांनी तुला अडचणीतून सोडवतो, पैसे देतो आणि मुस्लिम मुलीसोबत लग्नही लावतो, असे आमिष दाखवून घोषणापत्र लिहून घेतल्याचे दुसऱ्या बाँडमध्ये नमूद केले आहे. त्यातच मला मुस्लिम धर्माची तत्त्वे मान्य नाहीत, मी मुस्लिम धर्माचा कधीही अभ्यास केला नाही. माझे मोहंमद शाहजाद मनोहर असे नावही मी बदलले नाही व त्याबाबत गॅझेट प्रसिद्ध केलेले नाही." असंही त्या बाँडमध्ये लिहिले आहे.
तरुणाच्या या धक्कादायक दाव्यामुळे हे प्रकरण गंभीर बनलं आहे. या तरुणाला कोणी धर्मांतरण करण्यास सांगितलं? का सांगितलं? त्या तरुणावर धर्मांतरण करण्यासाठी काही दबाव होता का? बीडमध्ये धर्मांतरण करणारे रॅकेट सक्रीय आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.