कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना रातोरात केले कार्यमुक्त

दीड वर्ष अहोरात्र कोरोना रुग्णाची सेवा करण्याची आपली भूमिका कर्मचाऱ्यांनी चोख बजावली. मात्र आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असून कर्मचाऱ्यांना पगार देण परवडत नसल्याच कारण देत रातोरात या आरोग्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे.
कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना रातोरात केले कार्यमुक्त
कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना रातोरात केले कार्यमुक्तराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : कोरोना प्रादुर्भावcorona2020 मध्ये सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेवरHealth system प्रचंड ताण निर्माण झाला. आरोग्य यंत्रणेत कमी कर्मचारी आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने कंत्राटी आरोग्य सेवक,Contract Health Worker सेविका, तांत्रिक कर्मचारी आणि इतर संलग्न कर्मचाऱ्यांची भरती केली. दीड वर्ष अहोरात्र कोरोना रुग्णाची सेवा करण्याची आपली भूमिका कर्मचाऱ्यांनी चोख बजावली. मात्र आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असल्याने आणि कर्मचाऱ्यांना पगार देण्यास परवडत नसल्याने रातोरात रायगड जिल्ह्यातीलRaigad District शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले.Contract employees were laid off.

हे देखील पहा-

त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषणChain fast सुरू केले आहे. आम्हाला कायमस्वरूपी सेवेत घ्या अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली. काही जण मृत्यमुखी पडले. अशा काळात आरोग्य यंत्रणेसोबत कंत्राटी कर्मचारी हे आपली सेवा देत होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नातेवाईकही या कोरोनाच्या विषाणूने मृत्युमुखी पडले स्वतःलाही कोरोनाची लागण झाली. तरीही ते आपली सेवा बाजवत होते. मात्र अचानक शेकडो कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी कार्यमुक्त केल्याने त्याची अवस्था आता बिकट झाली आहे. या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नव्हता, विमा संरक्षण ही नव्हते असे असूनही काम करीत होते. पण आता कार्यमुक्त केल्याने त्याच्यावर उपोषण करण्याची वेळ आली आहे.

कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना रातोरात केले कार्यमुक्त
तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकीच आम्ही बघतो; राज ठाकरेंचा कल्पिता पिंपळेना शब्द

राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत आम्हाला प्राधान्य द्यावे आणि कायमस्वरूपी करून घ्यावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. तिसरी लाटेची संभावना असताना या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले असल्याने येणाऱ्या लाटेबाबत आता आरोग्य यंत्रणा कशी सामोरे जाणार हा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com