राजेश भोस्तेकर
रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील (Raigad District Hospital) रेलिंगची दुरावस्था झाली असून आज सकाळच्या सुमारास याचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नविन रेलिंग बांधण्याची परवानगी देण्यात आली असून जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही रेलिंगचे काम सार्वजनिक विभागाकडून सुरू करण्यात आले असल्याने नातेवाईकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय हे 1984 साली बांधण्यात आले आहे. सध्या या इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. असे असूनही इमरतीची ढागडुजीवर करोडोचा खर्च करण्यात आला आहे. रुग्णाला वार्डमध्ये स्ट्रेचरद्वारे नेण्यासाठी रेलिंग बांधण्यात आले आहे. मात्र या रेलीगची सध्या दुरवस्था झाली असून कधीही पडण्याची शक्यता आहे. रेलिंगच्या पिलरना तडे गेले आहे. अनेकवेळा स्लॅबचा काही भाग पडण्याच्या घटना घडत असतात. आजही सकाळच्या सुमारास स्लॅबचा काही भाग कोसळला आहे. यात कोणाला इजा झालेली नाही आहे.
रेलिंगचे काम नव्याने करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी मंजूर झाला आहे. मात्र याच रेलीगवरून ऑक्सिजन लाईन नेली असल्याने अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर रेलिंग पूर्ण पाडून नवीन काम करणे गरजेचे आहे अन्यथा एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना तसेच इतर आजाराच्या रुग्णांचे मतेवाईक या रेलीगचा वापर नेहमी करीत असतात. त्यामुळे त्याच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का अशी बोलण्याची वेळ आली आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.