Amit Deshmukh
Amit DeshmukhSaam TV

Beed News: आघाड्यांच्या राजकारणामुळे बीड जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय झाला: अमित देशमुख

Amit Deshmukh News: आघाड्यांच्या राजकारणामुळे बीड जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय झाला: अमित देशमुख
Published on

Beed News: आघाडीच्या राजकारणामुळे बीड जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय झाला. मात्र आता सर्वच दारे खुली झाले आहेत. त्यामुळं आता काँग्रेस बीड लोकसभा निवडणूक ताकतीने लढणार आहे, असं काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले आहेत.

जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघातही आम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत. अशी खंत आणि इच्छा अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. ते बीडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Amit Deshmukh
Doctors Village: कल्याणमधलं अनोखं डॉक्टरांचं गाव, प्रत्येक घरात आहे एक डॉक्टर...

यावेळी बोलताना ते म्हणाले, की बीड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचे कौतुक करावं वाटतंय. आतापर्यंत जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय झालाय. मात्र आता पुढील काळात ते होणार नाही. आज महाराष्ट्राची राजकीय परंपरा राहिलेली आहे. कुठंतरी त्याला छेद झालाय, असं मला आणि सर्वांना वाटतंय. (Latest Marathi News)

महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले. मात्र आज जे महाराष्ट्रात सुरू आहे, तेव्हा दुःख वाटतं. आता वाटाघाटीचे राजकारण आहे. आज पक्ष वाढत नाही, कारण आघाडीच्या राजकारणात संधी मिळाली नाही. अशी खंत देखील यावेळी अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

Amit Deshmukh
Maharashtra Politics: शिवसेनाप्रमुख अहंकारी नव्हते,पण आदित्य-उद्धव ठाकरे यांच्यात अहंकार भरलाय; शिंदे गटाच्या आमदाराची टीका

दरम्यान, बीडमध्ये होऊ घातलेल्या शरद पवारांच्या सभेला आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्याला अमित देशमुखांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com