Sudhir Tambe: डॉ. सुधीर तांबेंवर काँग्रेसची मोठी कारवाई; पक्षातून निलंबन, चौकशीही होणार

सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने शिस्तभंगांची कारवाई केली आहे.
Sudhir Tambe
Sudhir TambeSaam Tv
Published On

Sudhir Tambe Suspension : नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन झालेल्या प्रकारबाबत काँग्रेसने आता कठोर भूमिका घेतली आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने शिस्तभंगांची कारवाई केली आहे.

सुधीर तांबे यांनी पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतली. याबाबत चौकशी देखील होणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या परवानगीने की कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Sudhir Tambe
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जुन्या पेन्शन योजनेवर मोठं विधान; म्हणाले...

नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे अधिकृत उमेदवार होते. पक्षाने त्यांना एबी फॉर्म देखील दिली होता. मात्र शेवटच्या क्षणी तांबे कुटुंबियांना राजकीय खेळी केली. सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असताना देखील उमेदवारी दाखल केली नाही.त्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

Sudhir Tambe
Ajit Pawar :'मुख्यमंत्री जवळच्या आमदारांना खूश ठेवण्यासाठी...'; अजित पवारांचा गंभीर आरोप

सुधीर तांबे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसची मोठी अडचण झाली. नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडून कोणीही अधिकृत उमेदवार नाही. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती. त्यामुळे सुधीर तांबे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com