काँग्रेसच्या ताब्यातील मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त

उमरगा तालुक्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेली मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या ताब्यातली मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त
काँग्रेसच्या ताब्यातली मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तकैलास चौधरी
Published On

कैलास चौधरी

उस्मानाबाद : उमरगा Umarga तालुक्यातील काँग्रेसच्या Congress ताब्यात असलेली मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात आली आहे. किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने धान्य खरेदी करणे, कडता व सॅम्पल, ग्रेडिंग व्यवस्था नसणे,अशा विविध कारणाच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे देखील पहा-

महेश गव्हाणे यांनी एप्रिल 2019 मध्ये या संदर्भात तक्रार दिली होती. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांनी तक्रारीबद्दल जिल्हा उपनिबंधकांना बाजार समिती संचालक मंडळावर कारवाई करण्यासाठी सूचित केले होते. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख Vishwas Deshmukh यांनी हा आदेश काढला आहे.

काँग्रेसच्या ताब्यातली मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त
रस्त्यासाठी आधी खड्यात रक्तदान आंदोलन आता जागरण गोंधळ !

कृषी उत्पन्न बाजार समिती मुरूम विद्यमान मंडळ यांनी त्यांना सोपवलेली कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरल्याने व संचालक मंडळास दिलेल्या वैधानिक निर्देशांचे अनुपालन केले नसल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच सहाय्यक निबंधक पी.एल.शहापूरकर यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com