Navneet Rana News: नवनीत राणांच्या हिंदुत्ववादी राजकारणाविरोधात काँग्रेसची नवी चाल, राजकीय खेळीने सर्वच चकीत

Amravati Latest News: अमरावतीत खासदार नवनीत राणा यांनी राजकारणात चांगलाच जम बसवला आहे. अमरावतीत नवनीत राणा यांनी त्यांची राजकीय दिशा हिंदुत्ववादी राजकारणाकडे वळवली आहे.
Amravati News
Amravati NewsSaam tv

अमर घटारे

Amravati News: अमरावतीत खासदार नवनीत राणा यांनी राजकारणात चांगलाच जम बसवला आहे. अमरावतीत नवनीत राणा यांनी त्यांची राजकीय दिशा हिंदुत्ववादी राजकारणाकडे वळवली आहे. नवनीत राणा दिवसेंदिवस हिंदुत्ववादावरून आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. याचदरम्यान, अमरावतीत राणा यांना रोखण्यासाठी काँग्रेसने नवी राजकीय खेळी खेळली आहे. (Latest Marathi News)

अमरावतीत आता खासदार नवनीत राणा यांनी हिंदुत्ववादासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारविरोधात हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून अनेक आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. यामुळे अमरावतीत नवनीत राणा यांना शह देण्यासाठी काँग्रेसने नवी राजकीय शक्कल लढवली आहे.

Amravati News
NCP Upset on Nana Patole : काँग्रेस नेत्यांनंतर राष्ट्रवादीही नाना पटोलेंवर नाराज? कारणही आलं समोर

अमरावतीत काँग्रेसने हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला अमरावतीत एका कार्यक्रमाचे आयोजत केलं आहे. काँग्रेस अमरावतीत चक्क हनुमान जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व हनुमान चलीसा पठण करणार आहे. एकंदरित अमरावतीत हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.

Amravati News
Sandeep Deshpande Attack News: संदीप देशपांडेंवरील हल्ल्यातील मास्टरमाईंडबाबत मोठी अपडेट, हल्ल्याचं कारणही आलं समोर

अमरावतीत खासदार नवनीत राणा हिंदुत्वाचा नारा देत असल्याचे काँग्रेसही तोडीस तोड देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. अमरावतीत राजकीय जम बसवलेल्या नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांना पराभूत केले.

नवनीत राणा यांनी अडसूळ यांना ४८ हजार मतांनी पराभूत केली. नवनीत राणा यांच्या राजकीय भूमिकेनंतर काँग्रेसने अमरावतीत घेतलेल्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्य अमरावतीत चांगलेच सक्रिय झाले आहेत. तर नवनीत राणा यांना लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला होता. मात्र, सध्या नवनीत राणा यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली असून त्यांच्या राजकारणाची दिशा भाजपच्या विचारधारेकडे झुकत चालल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com