'दाढीवाला बाबा काही पण करीत असताे, त्यावर विश्वास ठेवू नका'

आज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी कायदाबाबत माेठी घाेषणा केल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
yashomati thakur narendra modi
yashomati thakur narendra modi

अमरावती : केंद्र सरकारने मागे घेतलेले काळे कायदे हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. मोदी सरकारच्या पीछेहाटीची ही सुरुवात आहे. केंद्र सरकारने केवळ घोषणा करून चालणार नाही तर सभागृहात हे काळे कायदे मागे घेतल्याचे जाहीर करायला हवे अशी भावना काॅंग्रेसच्या नेत्या अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी व्यक्त केली.

yashomati thakur narendra modi
MRF MoGrip FMSCI इंडियन नॅशनल रॅलीत तनिका शानभाग द्वितीय

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कृषी कायदा मागे Farm Laws To Be Repeal घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर देशभरातून विराेधी तसेच समर्थनार्थ प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमरावतीच्या पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या शेतकरी न घाबरता संघर्ष करीत राहिला. हिटलरशाही, माेदीशाहीला आज शेतक-यांनी हरविले. हे तीन कायदे रद्द झाले हे आज तरी आपल्याला दिसून येत आहे.

वास्तविक हाेणे गरजेचे अन्यथा उत्तर प्रदेशची निवडणुक डाेळ्यासमाेर ठेऊन हे नुसतंच म्हटलं जाईल. कारण आपला दाढीवाला बाबा काही पण करीत असताे. यावर विश्वास न ठेवता संसदेत कायदा रद्द झाला पाहिजे. आगामी काळातील निवडणुकांत ते हरतच राहणार हे लक्षात घ्यावं. आज लाेकशाहीचा विजय झाल्याचे यशाेमती ठाकूर यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com