Nana Patole On APMC Election Result : कृषी उत्पन्न बाजार समितीत 'मविआ' ची सरशी; नाना पटाेलेंचा भाजपला टाेला

राज्यातील 147 बाजार समितींच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या.
nana patole , bjp ,  Market Committee Election Results
nana patole , bjp , Market Committee Election Resultssaam tv

Nana Patole News : राज्यातील बहुतांश कृषी उत्तपन्न बाजार समितीत ( Market Committee Election Results) महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे तर काही ठिकाणी सत्तेकडे वाटचाल सुरु ठेवली आहे. यंदाच्या आत्तापर्यंतच्या निवडणूकीच्या निकालावर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले (nana patole) यांनी हा विजय म्हणजे लाेकांचा भाजप पक्षावरील राग आहे असे मत व्यक्त केले. भाजप (bjp) हा शेतकरी विरोधी आहे, महागाईच्या माध्यमातून जगणे मुश्किल करून ठेवल्याने शेतक-यांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याचे पटाेलेंनी नमूद केले. (Breaking Marathi News)

nana patole , bjp ,  Market Committee Election Results
Shirdi Bandh च्या निर्णयावर राधाकृष्ण विखे-पाटलांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती (पाहा व्हिडिओ)

नाना पटाेले म्हणाले देशात भाजपच्या विरोधात लाट आहे. त्यामुळेच भाजप विरोधातील चित्र आज बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालात दिसून येत आहे. काही ठिकाणी संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. परंतु संपुर्ण राज्याचे बाेलायचे झाले तर बाजार समितीच्या निवडणुकीत मविआची ताकद दिसून आली आहे. शेतक-यांचा प्रचंड राग सत्ताधा-यांबाबत आहे. त्यामुळेच भाजपला त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिली आहे.

nana patole , bjp ,  Market Committee Election Results
Accident News: समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; ट्रकला धडकून पोलीस वाहन चक्काचूर; महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

सरकारने बारसूतील लाेकांशी चर्चा करावी

बारसू प्रकल्पाविषयी बाेलताना पटाेले म्हणाले कोकणातला माणूस निसर्गप्रेमी आहे, भलेही ताे बाहेर नोकरी करत असतील तरी सणांना आपल्या घरी परत येतात. बारसूत लोकांचा विरोध का आहे याबाबत स्थानिकांशी सरकारने चर्चा करायला हवी. सरकारच्या बगलबच्च्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत.

या जमिनीला जास्त भाव मिळावा म्हणून प्रकल्प रेटून नेणे उचित नाही. या सर्व जमिनी परप्रांतियांनी घेतल्या आहेत. विदर्भातील प्रकल्प गुजरातला नेले, पण रिफायनरीचा प्रकल्प कोकणातच व्हावा यासाठी हे सरकार आग्रही का आहे ? असा सवाल पटाेलेंनी केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com