Nagpur News : नागपुरात काँग्रेसमध्ये पुन्हा मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे सुनील केदार यांनी काल सुधाकर आडबाले यांना समर्थन जाहिर केलं. यावरून नागपुरात काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद उघड असल्याचे दिसून आले आहे. (Latest Marathi News)
नागपुरात काँग्रेसमध्ये (Congress) पुन्हा एकदा मतभेद असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांचा शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर यावेळी देशमुख यांनी नाना पटोले यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांनी काल सुधाकर आडबाले यांना समर्थन जाहीर केलं. यावरून नागपुरातील काँग्रेस नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. उमेदवारांना पाठिंबा देण्यावरून नागपूर शिक्षक मतदारसंघात पुन्हा नाट्यमय घडामोडी पाहायाला मिळत आहे.
दोन वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा देण्यावरून आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष देशमुख म्हणाले, 'नाना पटोले (Nana Patole) यांच्या मुळं घोळात घोळ सुरु आहे. शिक्षक मतदारसंघात सुधाकर आडबले यांना काँग्रेसने समर्थन दिलं. मात्र पदवीधर निवडणुकीत शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसला मदत केली होती. त्यांना शिक्षक मतदारसंघात मदत करण्याचे काँग्रेस नेत्यांनी वचन दिलं होतं. त्यामुळं आश्वासन पाळत आहोत. काल काँग्रेस नेत्यांनी जे समर्थन जाहीर केलं, ते त्यांचं वैयक्तिक आहे. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पद सांभाळता येत, त्यांना पदावरून हटवावे'.
नागपुरातील काँग्रेस नेत्यांमधील मतभेदावर वरिष्ठ नेते काय प्रतिक्रिया देणार?
दरम्यान, माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी थेट नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. तर देशमुख यांनी नागपूर शिक्षक मतदारसंघात शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना जाहीर समर्थन दिलं आहे. तर दुसरीकडे सुनील केदार यांनी शिक्षक मतदारसंघात सुधाकर आडबले यांना पाठिंबा जाहीर केला. यावरून नागपुरातील काँग्रेस नेत्यांचे मतभेद उघड झाले आहे. उमेदवारांना पाठिंबा देण्यावरुन पक्षात दोन गट झाल्याने काँग्रेसचे वरिष्ठ नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.