सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई : पंजीबमधील काँग्रेस (Congress) नेते आणि प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला ( Sidhu Moose Wala) यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली. मूसेवाला यांच्या हत्येनंतर देशभरातील त्यांचा चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.मूसेवाला यांच्या हत्येनंतर देशासहित राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पंजाब सरकारने मूसेवालाची सुरक्षा गरज नसतानाही काढून घेतल्याने हत्या झाल्याचा आरोप होत आहे. या हत्येच्या (Murder) विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून नवी मुंबईत (Navi Mumbai ) निषेध आंदोलन करण्यात आले आहे. ( Navi Mumbai Latest News In Marathi )
हे देखील पाहा -
गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंजाब सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. पंजाब सरकारने त्यांना सुरक्षा गरज नसतानाही त्यांचे पोलीस संरक्षण काढून हत्या झाल्याचा आरोप होत आहे. या हत्येचा विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून आंदोलन केले. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यातर्फे वाशी येथील शिवाजी महाराज चौकात पंजाब सरकारच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्र युवक काँग्रेसने आप नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पुतळ्याचे दहन केले. या हत्येला आपचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप कुणाल राऊत यांनी या आंदोलनादरम्यान केला आहे. या निषेध आंदोलनात नवी मुंबईतील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
दरम्यान, सिद्धू मूसेवाला हत्येच्या घटनेनंतर पंजाब पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू केला आहे. आज पंजाब पोलिसांनी सूत्र हलवत उत्तराखंडच्या देहरादून येथील एका गावाच्या चौकीजवळ एसटीएफच्या मदतीने सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांमधून एक जण मूसेवाला हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा पंजाब पोलिसांना संशय आहे. पंजाब पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Edited By - Vishal Gangurde
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.