Chandrapur : चंद्रपूरमध्ये कोळसा खाण प्रकल्पग्रस्त महिलांचे जलसमाधी आंदोलन

कर्नाटक एम्टा या खाणीमुळे या गावातील लोकांना प्रदूषण, पाण्याची खालावलेली पातळी आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे आंदाेलकांनी नमूद केले.
coal project affected citizens andolan in chandrapur
coal project affected citizens andolan in chandrapur Saam tv

Chandrapur News :

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बरांज गावात कर्नाटक एम्टा कोळसा खाण प्रकल्पग्रस्त महिलांनी खाणीत जाऊन आंदोलन सुरू केले आहे. आपल्या पुनर्वसन विषयक मागण्या मान्य झाल्याशिवाय खाणीतील महाकाय खड्ड्यातील पाण्यात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदाेलक महिलांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

थंडी-उन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता गेल्या ५५ दिवसांपासून कर्नाटक एम्टा कोळसा खाणीबाहेर या महिला साखळी उपोषण करताहेत. या उपोषणा दरम्यान आतापर्यंत 7 महिलांनी आमरण उपोषण देखील केले आहे. काहींची प्रकृती खालावल्यामुळे आंदाेलक महिलांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

coal project affected citizens andolan in chandrapur
Papaya Rate Hike : नंदुरबारमध्ये पपई उत्‍पादक शेतकऱ्यांत चैतन्याचे वातावरण, जाणून घ्या नवा दर

या गावाजवळील 200 हेक्टर जमीन सरकारने 2008 मध्ये अधिग्रहित करून कर्नाटक एम्टा या कंपनीला कोळसा खाणीसाठी दिली. मात्र या गावाचे पुनर्वसन करण्यात न आल्याने खाणीमुळे या गावातील लोकांना प्रदूषण, पाण्याची खालावलेली पातळी आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा दावा आंदाेलकांनी केला आहे. हे उपोषण सुरू केले आहे. त्यात आता जलसमाधी आंदोलनाची भर पडली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

coal project affected citizens andolan in chandrapur
Dhule : 'आता फक्त विधानसभेत गोळीबार व्हायचा राहिलाय, तेवढे करून टाकाच'; अनिल गाेटेंचा महायुतीला टाेला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com