मुंबई : सामाजिक चळवळी, लोकपरंपरा, संतसाहित्य अशा विविध क्षेत्रात तसेच स्त्रिया, वंचिताच्या न्याय हक्कांसाठी डॉ. गेल ऑम्व्हेट Gail Omvedt उर्फ शलाका पाटणकर यांनी संशोधक, अभ्यासक म्हणून सक्रिय असे योगदान दिले आहे. समाजमनाशी एकरूप विदुषी म्हणून त्यांच्या योगदानाची नोंद राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी डॉ. ऑम्व्हेट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे आज (बुधवार) कासेगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार हाेणार आहेत. डाॅ. गेल या कष्टकरी जनतेसाठी अखेर पर्यंत कार्यरत राहिल्या. पती डाॅ. भारत पाटणकर यांच्या प्रत्येक चळवळीत त्यांचे याेगदान राहिले आहे.
राज्यातील विविध क्षेत्रातून डाॅ. गेल ऑम्व्हेट यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमनाशी एकरूप विदुषी म्हणून त्यांच्या योगदानाची नोंद राहील अशा शब्दांत डॉ. ऑम्व्हेट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शाेक संदेशात त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीची माेठी हानी झाल्याचे म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.