Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; काय आहे कारण?

Maharashtra Politics : आज सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी लांबणीवर गेली आहे.
Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme Court
Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme CourtSaam Tv
Published On

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेना कुणाची? १६ आमदार पात्र की अपात्र? अशा विविध मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात राजकीय लढाई सुरू आहे. आज म्हणजेच मंगळवारी राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर महत्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती आहे. पाच न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती सुनावणीसाठी उपलब्ध नसल्यानं सुनावणी लांबणीवर पडल्याचं सांगितलं जातंय. (Latest Marathi News)

Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme Court
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदाराचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश

घटनापीठातील न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नसल्याने आज सुनावणी होऊ शकणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने  (Supreme Court) नोटीसद्वारे स्पष्ट केले आहे. आता राज्यातील सत्तासंघर्षावर पुढची सुनावणी कधी होणीर हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मागील काही महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढं ही सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले होते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना तीन आठवड्यांची मुदत देऊ केली होती. (Maharashtra Politics News)

Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme Court
राज्यपाल भगत सिंह कोशयारी आणि खासदार सुधांशू त्रिवेदींना वादग्रस्त वक्तव्य भोवणार? मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल

आज होणारी शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता होती. मात्र, आता ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती देण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणातील सुनावणी सुरू करण्याआधी दोन्ही बाजूने एकत्रितपणे संयुक्तपणे आपले मुद्दे सादर करावे असे घटनापीठाने म्हटले होते.

त्याचबरोबर दोन्ही बाजूने कोणत्या मुद्यावर कोणते वकील युक्तिवाद करतील हे देखील निश्चित करण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. जेणेकरून युक्तिवाद करताना सारखे तेच मुद्दे येणार नाही. लिखित स्वरुपात मुद्दे दिल्याने घटनापीठाला सुनावणी घेण्यास आणि निकाल लिहिण्यास मदत होते, असेही कोर्टाने म्हटले होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com