CM Eknath Shinde News: कुटुंबाची इच्छा होती म्हणून पंतप्रधानांना भेटलो, मोदींना भेटल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde Latest News: पंतप्रधानांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही सदिच्छा भेट होती आणि त्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे स्पष्ट केले.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesaam tv

CM Eknath Shinde Meet PM Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. राज्यात सुरू असलेल्या राजकीय गदारोळादरम्यान मुख्यमंत्र्यांनी अचानक पंतप्रधानांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज केवळ पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेण्याची माझ्या कुटुंबाची इच्छा होती, त्यामुळे आज आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी वेळ दिला आणि चांगल्या निवांत गप्पा झाल्या असे शिंदे यांनी म्हणाले.

ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी इर्शाळवाडी घटनेविषयी देखील संवेदना व्यक्त केल्या. तसेच राज्यात सुरू असललेले प्रकल्प, राज्यातील सध्याची परिस्थिती आणि पावसाची परिस्थितीत त्यांनी जाणून घेतली आणि या सर्वांबद्दलच अगदी मोकळेपणाने चर्चा झाली. काल झालेल्या इर्शाळवाडीच्या दुर्घटनेबाबतही त्यांनी संवेदना व्यक्त केली असे शिंदे यांनी सांगितले.

CM Eknath Shinde
Uddhav Thackeray News: राजकारणी म्हणून इर्शाळवाडीची घटना सर्वांसाठीच लाजिरवाणी, दुर्घटनाग्रस्तांचं सांत्वन केल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

पंतप्रधानांनी राज्यातील परिस्थिती जाणून घेतली - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, ईर्शाळवाडीच्या घटनेसोबतच, शेतकऱ्याच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांशी निगडीत योजनांवर देखील या भेटीत चर्चा झाली. राज्यातील आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत प्रकल्पावरविषयी देखील त्यांनी जाणून घेतलं. राज्यात डबल इंजीनचं सरकार काम करत आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. मधल्या काळात जे प्रकल्प थांबले होते, त्यांना देखील आम्ही गती दिली, असे शिंदे म्हणाले. (Tajya Marathi Batmya)

"कोकणातून दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्याबाबत चर्चा"

मुख्यमंत्री म्हणाले, कोकणातून समुद्रात वाहून जाणारं पाणी दुष्काळी भागाकडे कसं वळवता येईल याबाबतीतही गांभीर्याने काम करता येऊ शकतं, ही बाब देखील मी पंतप्रधानांच्या कानी घातली आहे. त्यांनी त्याबाबतीतही सकारात्मक भूमिका दाखवली. (Latest Political News)

CM Eknath Shinde
Anuradha Paudwal At Irshalwadi Landslide : अनुराधा पौडवाल यांनी घेतली इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांची भेट; मदतीची केली विनंती

"सदिच्छा भेट होती, वेगळं काही समजण्याची आवश्यता"

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, राज्यातील जनतेच्या हिताचे जे प्रकल्प आहेत, त्यांना केंद्र सरकार पूर्णपणे पाठबळ देईल असं देखील त्यांनी आम्हाला अश्वस्त केलं आहे. याशिवाय एकंदरीत राज्यातील सर्वच गोष्टींवर साधक-बाधक चर्चा झाली. ही सदिच्छा भेट असली तरी पंतप्रधानांसोबत सर्वच विषयांवर चांगली चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती त्यामुळे त्यात वेगळं काही समजण्याची आवश्यता नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com