मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द म्हणजे राज्याचा अपमान, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाने राज्याच्या राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द म्हणजे राज्याचा अपमान, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी
मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द म्हणजे राज्याचा अपमान, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणीSaam Tv
Published On

केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी राज्याचे मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाने राज्याच्या राजकारण Politics चांगलेच ढवळून निघाले आहे. नाशिकमध्ये Nashik राणेंविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, त्यांच्या अटकेचे Arrested आदेश निघाले आहेत. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी NCP काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनीही आपली प्रतिक्रिया यावेळी दिली आहे.

हे देखील पहा-

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करणे म्हणजे हा मुख्यमंत्र्यांचा नव्हे, तर राज्याच्या जनतेचा अपमान आहे. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर कुणी वागत असेल, तर कारवाई झाली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा नवाब मलिक यांनी यावेळी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारायण राणे यांच्या अटकेची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द म्हणजे राज्याचा अपमान, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी
नारायण राणेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड, Mahad पुणे Pune आणि नाशिकमध्ये Nashik या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून, त्यांना अटक करून न्यायालयासमोर court हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी Police काढले आहेत.

यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांचे पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना करण्यात आले आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होणार आहे. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com