निवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! RTI प्रवेशपत्रासाठी लाच घेताना क्लर्कला पकडले

परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला रंगेहाथ पकडले.
Bribe
BribeSaam tv

सोलापूर - ‘आरटीई’तून प्रवेश मिळालेल्या एका मुलाच्या पालकाकडून पाचशे रुपयांची मागणी करून तीनशे रुपये लाच (Bribe) घेताना महापालिका शिक्षण मंडळातील महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच रंगेहाथ पकडले. प्रभावती अंबादास वईटला (कस्सा) असे त्या महिला लिपिकाचे नाव असल्याची माहिती लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिली. ५८ वर्षीय महिला लिपिकाने बक्षीस स्वरूपात ही रक्कम स्वीकारली होती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे देखील पाहा -

सध्या बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याअंतर्गत २५ टक्के मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. आरटीईअंतर्गत नंबर लागलेल्या मुलांचे प्रवेश सध्या सुरु असून तक्रारदाराच्या मुलाचा ‘आरटीई’तून नंबर लागला होता.

Bribe
दापोली पोलीस स्टेशनला भीषण आग; महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती

त्याचे प्रवेशपत्र दिल्यानंतर बक्षीस म्हणून पाचशे रुपयांची मागणी केली होती. तेवढे पैसे नसल्याने त्या महिला लिपिकाने तक्रारदाराकडून तीनशे रुपये घेतले. त्यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला रंगेहाथ पकडले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com