रामदास कदम यांच्या विरोधात बोलाल तर...; खेडमध्ये कदम, ठाकरे समर्थकांमध्ये बाचाबाची

बैठकीत माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली.
Shivsena Bolitical Crisis
Shivsena Bolitical CrisisSaam TV
Published On

दापोली : दापोली (Dapoli) विधानसभा मतदार संघाच्या खेड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज भरणी नाका येथील बिसू हॉटेलमध्ये ठेवण्यात आली होती. आजची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी बोलावली होती.

या बैठकीसाठी शिवसेनेचे (Shivsena) सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, या बैठकी दरम्यान ठाकरे आणि कदम समर्थकांमध्ये बाचाबाजी झाली.

आजच्या बैठकीला सुरवात झाली असता विविध विषय आणि पक्षाशी एकनिष्ठ राहणे यावर जिल्हाप्रमुख कदम यांनी उपस्थितांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुरू केलं. कदम यांच्यानंतर माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केल्यायामुळे बैठकीत उपस्थित असाणाऱ्या कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Shivsena Bolitical Crisis
आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा; शिवसैनिकांनी संदीपान भुमरेंच्या बॅनरला फासले काळे

त्यानंतर त्या बैठकीतून माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांनी पळ काढला. परंतु कदम समर्थकांनी त्यांना त्या हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच गाठून यापुढे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या विरोधात जर बोलाल तर आम्ही खपवून घेणार नाही अशी तंबी दिली. शेवटी या बैठकीतून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी काढता पाय घेत बैठक गुंडाळली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com